कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जबरदस्त तडाखा पश्चिम महाराष्ट्राला ; आजही ‘हे’ तीनही जिल्हे रेड झोनमध्ये

मुंबई-पुण्याहून खासगी ट्रॅव्हल्स तुडुंब भरून रातोरात ग्रामीण भागात येत आहेत. यातील एकाही प्रवाशाची प्रशासनाकडे नोंद नाही, ना त्यांची चाचणी केली गेली. निर्बंध झुगारून परजिल्ह्यातून आलेल्यांचा संसर्ग वाढण्याला मोठा हातभार लागत असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.

    कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जबरदस्त तडाखा पश्चिम महाराष्ट्राला बसला. त्यातही सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील वाढता संसर्ग कमी होण्याचे नाव घेत नसल्याने प्रशासनाच्या तोंडचे पाणी पळाले आहे. आजही हे तीनही जिल्हे रेड झोनमध्ये आहेत.

    या दुरवस्थेच्या अनेक कारणांपैकी निर्बंधांना झुगारून पुण्या-मुंबईहून दाखल झालेली गर्दी हे एक प्रमुख कारण असल्याच्या चर्चेने आता जोर धरला आहे. १४ एप्रिल रोजी लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर उन्हाळ्याची सुटी गावीच घालवण्याच्या इराद्याने खासगी ट्रॅव्हल्स, जीप, अगदी रिक्षानेसुद्धा कुटुंबे आली आणि संसर्ग वाढत गेला.

    मुंबई-पुण्याहून खासगी ट्रॅव्हल्स तुडुंब भरून रातोरात ग्रामीण भागात येत आहेत. यातील एकाही प्रवाशाची प्रशासनाकडे नोंद नाही, ना त्यांची चाचणी केली गेली. निर्बंध झुगारून परजिल्ह्यातून आलेल्यांचा संसर्ग वाढण्याला मोठा हातभार लागत असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.

    परजिल्ह्यातून येणाऱ्यांना कोणीही ई-पास मागत नाही की, तुम्हाला परवानगी आहे का, याची विचारणा करत नाही. याचे आश्चर्य गावकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. दुसऱ्या लाटेत गावपातळीवरील समित्याही कार्यरत नव्हत्या. त्यामुळे अशा लोकांना आणखी मोकळे रान मिळाले.