हस्तिदंत तस्करांच्या आवळल्या मुसक्या; तिघांना अटक

हस्तीदंत विक्रीसाठी येणाऱ्या तिघांना गुरुवारी कोल्हापूर वनविभागाने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून हस्तीदंताचे सुमारे 965 ग्राम वजनाचे तीन नग जप्त करण्यात आले. कोल्हापूर पन्हाळा रस्त्यावर हॉटेल ग्रीनफिल्ड परिसरात ही कारवाई करण्यात आली.

    कोल्हापूर (Kolhapur). हस्तीदंत विक्रीसाठी येणाऱ्या तिघांना गुरुवारी कोल्हापूर वनविभागाने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून हस्तीदंताचे सुमारे 965 ग्राम वजनाचे तीन नग जप्त करण्यात आले. कोल्हापूर पन्हाळा रस्त्यावर हॉटेल ग्रीनफिल्ड परिसरात ही कारवाई करण्यात आली.

    माणिक विलासराव इनामदार, सागर आबासाहेब साबळे, धनंजय केरबा जगदाळे. अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. कोल्हापूर-पन्हाळा रस्त्यावर हॉटेल ग्रीनफील्डजवळ काही जण हस्तीदंत विक्रीसाठी येणार असल्याचे माहिती वनविभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारावर कोल्हापूर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळ रचला. त्यानंतर या तिघांवर कारवाई करण्यात आली. या कारवाई दरम्यान वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तीन हस्तिदंतांसह एक इनोव्हा गाडी, एक दुचाकी व तीन मोबाईल जप्त केले.