सावत्र बापाने चिमुकल्या मुलीला पंचगंगेत बुडवून मारले; इचलकरंजीतील घटना

    कोल्हापूर (Kolhapur) : जिल्ह्यात इचलकरंजी शहरालगतच्या (Ichalkaranji town) यळगूड गावात (Yalgud village) राहणाऱ्या पित्याने आपल्या सावत्र मुलीची (stepdaughter) हत्या (Kill) केली होती. नऊ वर्षीय मुलीला (The nine year old girl) पंचगंगा नदी (Panchganga river) घाटावर नेऊन पाण्यात बुडवून ढकलून (drown) दिले. यामध्ये अल्पवयीन मुलीचा मृत्यू (The minor girl die) झाला. हा प्रकार मंगळवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला.

    मुलीचा मृतदेह मोठ्या पुलाच्या पलिकडील बाजूला नदी किनाऱ्यावर अडकल्याचे शोध पथकाला आढळून आले. बऱ्याच प्रयत्नानंतर तो मृतदेह पात्राबाहेर काढण्यात आला. चौदा तासांच्या अथक प्रयत्नानंतर मृतदेह शोधण्यास पोलीस आणि रेस्क्यू फोर्सच्या टीमला यश आले. यावेळी विजया पोतदार यांचा मृतदेह सापडला.

    तीन गुन्ह्यांनी कोल्हापूर हादरलं (Kolhapur shaken by three crimes)
    कोरोना महामारी, लॉकडाऊन आणि महापुराच्या संकटाने विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर येत चालले आहे. असे असतानाच आता इचलकरंजी शहरासह जिल्ह्यामध्ये तीन मोठ्या गुन्ह्याच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. शिरोळ तालुक्यात एका निर्दयी बापाने आपल्या मुलीचे एका दुसऱ्या मुलीवर प्रेम असल्याच्या संशयावरुन कृष्णा नदीमध्ये ढकलून दिले होते. त्यामध्ये त्या मुलीचा मृत्यू झाला होता.

    हे प्रकरण ताजे असतानाच कागल तालुक्यात एकाने मूल होत नसल्याच्या कारणावरून आपल्या मित्राच्या मुलाला पळवून नेऊन त्याची निर्घृण हत्या केली होती. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये खळबळ माजली होती. त्याचपाठोपाठ आता हातकणंगले तालुक्यातील यळगूड गावातील व्यक्तीने आपल्या सावत्र मुलीची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली.