सामाजिक क्षेत्रातील घाटगे कुटुंबियांचं कार्य कौतुकास्पद : उद्योगपती संजय घोडावत

    जयसिंगपूर : कष्टाच्या जीवावर माधवराव घाटगे यांनी उद्योग क्षेत्रात भरारी घेतली आहे. माणसाची प्रगतीही त्याच्या विचारावर होते. रात्रीचे स्वप्न खरे होत नाही तर दिवसाची स्वप्ने साकारायला शिकले पाहिजे. योग्यवेळी योग्य निर्णय घेणे गरजेचे आहे. त्या जीवावरच व्यक्ती अशक्य गोष्टी शक्य करू शकतो. घाटगेंनी ते शक्य केले आहे, असे प्रतिपादन उद्योगपती संजय घोडावत यांनी केले.

    कोल्हापूर येथे सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टच्या वतीने गुरुदत्त शुगर्स टाकळीवाडीचे चेअरमन माधवराव घाटगे याना उद्योगरत्न पुरस्कार उद्योगपती संजय घोडावत यांच्या हस्ते देण्यात आला. अध्यक्षस्थानी सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे चेअरमन अशोक दुगाडे होते.

    यावेळी पुरस्काराला उत्तर देताना चेअरमन घाटगे म्हणाले, चिंचवाडसारख्या ग्रामीण भागातून असताना देखील उद्योग क्षेत्रात पाऊल ठेवले. आजोबा व वडीलाच्या विचाराने पुढे मार्गक्रमण करत लोकांच्या हाताला रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न केला. आपल्या कामाबरोबरच समाज्यासाठी काहीतरी देणे लागतो या भावनेतून गोरगरीबसाठी मदत केली पाहिजे. प्रत्येकाने आपले योगदान सामाजिक व गोरगरीबाच्या मदतीसाठी द्यावे असे त्यांनी सांगितले. यावेळी विशाल महाडिक, हर्षवर्धन भुर्के, प्रदीप मांजरेकर यांच्यासह मान्यवरानी मनोगत व्यक्त केले.

    यावेळी संजय शेटे, गोरख माळी, विद्यानंद बेडेकर, पल्लवी कोरगावकर, अतुल पाटील, सचिन मेनन, शांताराम सुर्वे, मोहन मेस्त्री, श्रीकांत पोतनीस, तुषार अतुरकर, अजय कोराने यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.