कंगणासारख्या नटवीनं शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणणं यापेक्षा दुसरा विनोद नाही : राजू शेट्टी

इचलकरंजी : कृषी विधेयकाविरोधात रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणणाऱ्या अभिनेत्री कंगना रनौतविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी निशाणा साधला आहे.

“कंगनासारख्या नटवीनं शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणणं यापेक्षा दुसरा विनोद नाही. शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न यावर हिमाचल प्रदेश सारख्या एका उंच टेकडावर जन्माला आलेल्या नटीने बोलणं यापेक्षा मोठा विनोद काय असू शकतो. कंगनाला पुढे करणाऱ्यांना शिखंडे म्हणावं की काय म्हणावं यासाठी मला शब्द सूचत नाही. शेतकरी त्यांच्या न्याय हक्कासाठी लढत असताना या नट-नट्या जर त्यांचा अपमान करत असतील तर शेतकऱ्यांची पोरं हातात दगडं घेऊन रस्त्यावर उतरतील.” अशा शब्दांत राजू शेट्टी यांनी कंगनाचा समाचार घेतला आहे.