uday samant

कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून राज्यातील महाविद्यालये सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. राज्यभरातील ग्रंथालये सुरू करण्याबाबत सरकार सकारात्मक असून त्याबाबत तत्त्वतः निर्णय घेतला आहे. याचा कशा पद्धतीने नियम असावा, याबाबत येत्या ८ दिवसांमध्ये निर्णय घेण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा ग्रंथालये सुरू करण्याबाबत निर्णय घ्यावा लागेल, असे सूचित केले असून लवकरच ग्रंथालये सुरू होणार असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले.

  • लवकरच ग्रंथालये सुरू होणार

कोल्हापूर : कोरोनाचा प्रभाव (Corona Virus) अजूनही दिसतो आहे. त्यामुळे राज्यात सद्य परिस्थितीत महाविद्यालय (College) सुरू करता येणार नाहीत. राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असला तरी, संपूर्ण परिस्थिती आटोक्यात येत नाही, तोपर्यंत महाविद्यालये सुरू ( start college) करण्याबाबत विचार करण्यात येणार नाही असे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत कोल्हापुरात सांगितले. कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठामध्ये येऊन सामंत यांनी अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबतचा प्रशासनाकडून आढावा घेतला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

ते म्हणाले,कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून राज्यातील महाविद्यालये सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. राज्यभरातील ग्रंथालये सुरू करण्याबाबत सरकार सकारात्मक असून त्याबाबत तत्त्वतः निर्णय घेतला आहे. याचा कशा पद्धतीने नियम असावा, याबाबत येत्या ८ दिवसांमध्ये निर्णय घेण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा ग्रंथालये सुरू करण्याबाबत निर्णय घ्यावा लागेल, असे सूचित केले असून लवकरच ग्रंथालये सुरू होणार असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले.

सीमा भागातील शैक्षणिक संकुलाबाबत बोलताना मंत्री सामंत म्हणाले, सीमा भागातील शिनोळी या गावात दहा एकर जागा आहे. त्या ठिकाणी लवकरच शैक्षणिक संकुल उभे करण्यात येणार असून जानेवारी महिन्यापासून याठिकाणी विविध अभ्यासक्रमांना सुरुवात होणार आहे.ते म्हणाले, कोरोनाच्या परिस्थितीमध्ये शाळा महाविद्यालये बंद असताना संस्थाचालक विद्यार्थ्यांच्याकडून सक्तीने फी घेत असतील तर, अशा संस्थाचालकांच्या विरोधात शिक्षण उपसंचालक कार्यालयात तक्रार दाखल करावी. अशा संस्थांवर निश्चित कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही सुद्धा मंत्री उदय सामंत यांनी दिली.