कर्ज माफीसाठी हजारो महिलांचा  जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल

महिलांच्या हाताला रोजगार नाही. त्यामुळे कर्ज भरण्यात अडचण येत आहे. त्यातच मोठ्या प्रमाणावर वसुलीसाठी तगादा लावत असल्याने या मायक्रो फायनान्स कंपनीच्या विरोधात आज हजारो हल्लाबोल केलाय.

    कोल्हापूर: मायक्रो फायनान्सची कर्ज माफ करा या मागणीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यातील हजारो महिलांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढला आहे. छत्रपती शासन या संस्थेच्या पुढाकारातून ताराराणी चौकातून थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारो महिला भर पावसात या मोर्चात सहभागी झाल्या आहेत. छत्रपती शासनच्या संस्थापक अध्यक्ष दिव्या मगदूम यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आलाय.

    जिल्हाधिकारी कार्यालयावर महिलांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे. जोपर्यंत मायक्रो फायनान्स कर्ज माफ होत नाही तोपर्यंत इथून न उठण्याचा इशारा महिलांनी दिला आहे. लॉकडाऊन आणि महापुराच्या काळात महिलांना कर्ज वसुलीसाठी फायनान्स कंपन्यांनी मोठा तगादा लावला तसेच काही ठिकाणी शिवीगाळ आणि महिलांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडलाय.

    त्यामुळे महिलांच्या हाताला रोजगार नाही. त्यामुळे कर्ज भरण्यात अडचण येत आहे. त्यातच मोठ्या प्रमाणावर वसुलीसाठी तगादा लावत असल्याने या मायक्रो फायनान्स कंपनीच्या विरोधात आज हजारो हल्लाबोल केलाय. भर पावसात हातात फलक आणि काठी घेऊन महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात ठिय्या मारला आहे. जोपर्यंत मायक्रो फायनान्स कर्ज माफ होत नाही. तोपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय दारातून देणार नसल्याचा इशारा महिलांनी दिला आहे.