रंगपंचमी खेळून पोहायला गेलेल्या तीन तरुणांचा बुडून मृत्यू : कोल्हापूर जिल्ह्यातील दोन वेगवेगळ्या ठिकाणच्या दुर्दैवी घटना

पन्हाळा तालुक्यातील कोडोली येथील दोन शाळकरी मुलांचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली.शिवराज कृष्णा साळोखे (वय १४ वर्षे) आणि शुभम लक्ष्मण पाथरवट (वय १४ वर्षे) हे रंगपंचमी साजरी करुन मित्रांसोबत आंघोळीसाठी विहिरीवर गेले. शिवराज व शुभमला पोहता येत नव्हते. कपडे काढून ते विहिरीच्या कठडयावर बसले होते.तोल जाऊन विहिरीत कोसळले.आणि गुदमरून त्यांचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

    कोल्हापूर : रंगपंचमीच्या रंगाची उधळण सुरू असताना जिल्ह्यात वेगवेगळया दोन ठिकाणी दुर्दैवी घटना घडल्या. करवीर तालुक्यातील शिंगणापूर येथील एका तरुणाचा आणि पन्हाळा तालुक्यातील कोडोली येथल दोन शाळकरी मुलांचा रंगपंचमी खेळून पोहायला गेल्यावर बुडून मृत्यू झाला.

    करवीर तालुक्यातील शिंगणापूर येथील सोळा वर्षीय यशराज राजू माळी हा सध्या दहावीत शिकत होता. शुक्रवारी सकाळी तो मित्रासोबत रंगपंचमी साजरी केली. त्यानंतर आंघोळीसाठी गणेशनगर येथील खणीत गेला.मात्र गणेशला पोहायला येत नव्हते. खणीतील गाळात अडकून त्याचा मृत्यू झाला.

    तर दुसरीकडे पन्हाळा तालुक्यातील कोडोली येथील दोन शाळकरी मुलांचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली.शिवराज कृष्णा साळोखे (वय १४ वर्षे) आणि शुभम लक्ष्मण पाथरवट (वय १४ वर्षे) हे रंगपंचमी साजरी करुन मित्रांसोबत आंघोळीसाठी विहिरीवर गेले. शिवराज व शुभमला पोहता येत नव्हते. कपडे काढून ते विहिरीच्या कठडयावर बसले होते.तोल जाऊन विहिरीत कोसळले.आणि गुदमरून त्यांचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.