कुंभोजमध्ये मोबाईल ॲपद्वारे ई-पीक पाहणीबाबत प्रशिक्षण

हातकणंगले तालुक्यातील कुंभोज येथे मोबाईल ॲपद्वारे ई-पिक पाहणीबाबत हातकणंगलेचे तहसीलदार प्रदीप उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण देण्यात आले.

    हातकणंगले : हातकणंगले तालुक्यातील कुंभोज येथे मोबाईल ॲपद्वारे ई-पिक पाहणीबाबत हातकणंगलेचे तहसीलदार प्रदीप उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण देण्यात आले. शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी ऍपद्वारे आपल्या शेतातील गट नंबरनुसार वेगवेगळ्या पिकांची नोंदणी कशी करावी, याबाबतचे मार्गदर्शन व सूचना हातकणंगले तहसीलदार प्रदीप उबाळे यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रशिक्षण दिले.

    कुंभोजमध्ये जवळपास चार हजार खातेदार असून, शेतकऱ्यांनी ई-पीक शेतकऱ्यांनी पीक पाहणीचा जास्तीत जास्त वापर करून आपल्या शेतीच्या गट नंबरमधील योग्य त्या पिकांची नोंदणी करावी, अशा सूचना तहसीलदार प्रदीप उबाळे यांनी दिल्या.

    यावेळी माजी पंचायत समिती सदस्य संतोष माळी, सरपंच माधुरी घोदे, उपसरपंच दाविद घाटगे, तलाठी संभाजी घाटगे, ग्रामविकास अधिकारी ए. एस. कठारे, पोलीस पाटील महम्मद पठाण, कृषी सहाय्यक क्रांती गुरव, ग्रामपंचायत सदस्य अशोक आरगे यांच्यासह इतर शेतकरी बांधव उपस्थित होते.