अंबाबाई मंदिरात बॉम्ब ठेवल्याचा फोन; त्यामागचं सत्य आलं समोर…

शारदीय नवरात्र उत्सवाच्या पहिल्याच दिवशी अंबाबाई मंदिरात (Ambabai Kolhapur) बॉम्ब (Planting Bomb) ठेवला आहे, असा फोन करून खळबळ माजविणाऱ्या सासरा व जावयास पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

    कोल्हापूर : शारदीय नवरात्र उत्सवाच्या पहिल्याच दिवशी अंबाबाई मंदिरात (Ambabai Kolhapur) बॉम्ब (Planting Bomb) ठेवला आहे, असा फोन करून खळबळ माजविणाऱ्या सासरा व जावयास पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. दारूच्या नशेत जावायाने फोन केला असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. बाळासो कुरणे (सासरा), सुरेश लोंढे (जावई) अशी त्यांची नावे आहेत. 
    याबाबतची माहिती अशी की, लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात काल गुरुवारपासून नवरात्र उत्सवाला प्रारंभ झाला. सकाळी घटस्थापना करून सर्व धार्मिक विधी पार पडल्यानंतर दुपारी तीनच्या सुमारास मंदिर आवारात बाॅम्ब ठेवला असल्याचा निनावी फोन गोवा कंट्रोल रूमला गेला. याबाबतचा मेसेज कोल्हापूर पोलिसांना आला होता. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली, पोलीसांनी तात्काळ हालचाल करून संपूर्ण मंदिर परिसराची तपासणी करण्याचे काम वेगाने सुरू केले.
    यावेळी पोलिसांनी तातडीने मंदिरातील दर्शन थांबून बॉम्ब शोध पथकास पाचारण केले. मात्र, मंदिराच्या आवारात कुठेही बॉम्ब सदृश्य वस्तू आढळून आली नाही. त्यामुळे पोलिस निविश्वास टाकला. परंतु या फोनचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी फोनच्या पाठीमागील शक्तीचा शोध घेण्याच काम सुरू केले. स्वतंत्र पोलिस यंत्रणा राबवून हा मोबाईल नंबर कोणाचा याबाबतचा तपास सुरू केला. अधिक तपास केला असता हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगाव येथील बाळासो कुरणे यांच्या नावे हा नंबर असल्याचे आढळून आले.
    पोलिसांनी तत्काळ त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर हा मोबाईल जावई सुरेश लोंढे यांच्याकडे असल्याचे निष्पन्न झाले. अधिक तपास केला असता त्यांने दारूच्या नशेत हा फोन केला असल्याचे पुढे आले आहे. मात्र, या पाठीमागे आणि काय आहे का याबाबतचा तपास पोलीस यंत्रणा करत असल्याचे जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे यांनी पत्रकारांना सांगितले.