उद्धव ठाकरेंचं निर्मला सीतारमण यांना पत्र, पूरग्रस्तांसाठी काय केली मागणी? : वाचा सविस्तर

  कोल्हापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री आज कोल्हापुरातील पूरस्थितीची पाहणी करत आहेत. कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार धैर्यशील माने यांनी कोल्हापूर विमानतळावर मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं. दरम्यान मुख्यमंत्री कालच कोल्हापूरला जाणार होते. मात्र हवामान विभागाने कोल्हापूरला पावसाचा रेड अलर्ट दिला होता. त्यामुळे हा दौरा पुढे ढकलण्यात आला होता.

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पहिल्यांदा कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी या गावाची पाहणी केली. नृसिंहवाडी हे गाव आठवडाभरापासून पाण्यात आहे. पाऊस बंद झाला असला तरी पाणीपातळी अवघी दोन टक्के कमी झाली आहे. गावातील सर्व लोकांचे सुरक्षित स्थलांतर केले आहे. मात्र जनावरांचा चारा, लाईट पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. पाणी काही प्रमाणात ओसरलं असलं तरी कमरेएव्हढ्या पाण्यातून लोक घरापर्यंत पोहोचत आहेत.

  सितारमऩ यांना पत्र लिहून काय मदत मागितली?

  पाहणी आटोपल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत ही देखिल माहिती दिली की केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र लिहून मागणी केली आहे, बँका आणि विमा कंपन्यांना केंद्राकडून 50 टक्के रक्कम देण्याच्या सूचना देण्याची गरज आहे, असं ठाकरे यांनी स्पष्ट केले.

  तसेचं महसूल यंत्रणांनी केलेले पंचनामे ग्राह्य धरून पन्नास टक्के रक्कम बँकांनी आणि विमा कंपन्यांनी द्यावी अशा मागणीचा आग्रहदेखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून या पत्रकार परिषदेत करण्यात आला आहे.

  शिरोळ गाव आठवडाभर पाण्यात

  शिरोळ तालुक्यातील पाहणीदरम्यान, मुख्यमंत्र्यांभोवती ग्रामस्थानी एकच गर्दी केली होती. प्रत्येक जण आपआपली कैफियत थेट मुख्यमंत्र्यांसमोर मांडण्याचा प्रयत्न करत होते. शिरोळमध्ये पाहणी करत असताना, मुख्यमंत्र्यांना काही नागरिकांनी मागून आवाज दिला. ‘शिरोळ गाव आठवडाभर पाण्यात आहे. हे पाणी सांगलीतील जत तालुक्याला वळवलं तर हा दरवर्षी महापूर येणार नाही. आमचा शिरोळ तालुका महाराष्ट्राला निधी देईल इतका मोठा तालुका आहे. यावर कायमस्वरुपी तोडगा काढा’ असं इथल्या नागरिकाने मुख्यमंत्र्यांना सांगितलं.