विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित शाळांना अनुदान मिळाले पाहिजे : डॉ. सुजित मिणचेकर

    हातकणंगले : आई-वडिलांनी दिलेली सुसंस्कृतीची शिदोरी घेऊन समाजातील चांगल्या गोष्टींना बळ देण्याचे काम फाऊंडेशनच्या माध्यमातून सुरु असून, समाज सुधारण्यामध्ये महत्वाची भूमिका निभावणाऱ्या शिक्षकांना पुरस्कार देऊन त्यांच्या पाठीवर थाप मारण्याचे काम फाऊंडेशन करीत आहे. विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित असणाऱ्या शाळांना अनुदान मिळाले पाहिजे. शिक्षण क्षेत्रामध्ये असणारा असमतोल व्यवस्थित करण्यासाठी मी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेही कैफीयत मांडणार आहे, अशी ग्वाही माजी आमदार व गोकूळचे संचालक डॉ. सुजित मिणचेकर यांनी दिली.

    डॉ. सुजित मिणचेकर फाऊंडेशन यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या २o२१ चे आर्दश शिक्षक पुरस्कार कार्यकमात ते बोलत होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे इतिहासतज्ञ डॉ. अमर आडके हे आपल्या मनोगतामध्ये म्हणाले, कार्यक्रमामध्ये एखादा शिक्षक किती वेळ बोलतो त्यापेक्षा त्यांच्यामधील तळमळ काय आहे हे पाहणे फार गरजेचे असते. पुरस्कारापेक्षा शिक्षकांच्या त्यागाला व मेहनतीला फार महत्वाचे आहे. शिक्षक हे नेहमीच आर्दशच असतात. वर्गामध्ये इतिहास शिकवण्यापेक्षा शिक्षकांनी वर्षातून एकदा गड किल्लावर जाऊन मुलाना साक्षात ज्ञान दयावे असे आवाहान त्यांनी यावेळी डॉ. अमर आडके यांनी शिक्षकांना केले.

    यावेळी माजी सभापती राजेश पाटील, शिक्षक नेते दादासो लाड, महेश चव्हाण, प. स सदस्य पिंटू मुरुमकर, सभापती प्रवीण यादव, (अध्यक्ष ) फाऊंडेशन, स्वरुपा शेलार, संजय चौगुले, (सचिव), लेखा मिणचेकर, सार्थ मिणचेकर, रणजीत मिणचेकर, इंद्रजीत मिणचेकर, दीपक पाटील उपस्थित होते.