कोल्हापूर जिल्हयात अवकाळी पावसाचे थैमान, भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान

अवकाळी पावसामुळे भाजीपाल्याचे (vegetables) मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून गुऱ्हाळघरे, साखर कारखान्यांची ऊस तोडणी ठप्प झाली आहेत. त्याचप्रमाणे अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील हवामानात बदल झालेला दिसून येत आहे.

कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही भागांत पावसाच्या (rain) हलक्या सरी बरसल्या. त्याचप्रमाणे इतर राज्यातही पावसाने कहर केला. परंतु धक्कादायक म्हणजे कोल्हापूर (kolhapur district)  जिल्ह्यांत जोरदार पाऊस पडला असून भाजीपल्याचे मोठा प्रमाणात नुकसान झाले आहे.

अवकाळी पावसामुळे भाजीपाल्याचे (vegetables) मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून गुऱ्हाळघरे, साखर कारखान्यांची ऊस तोडणी ठप्प झाली आहेत. त्याचप्रमाणे अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील हवामानात बदल झालेला दिसून येत आहे.

पावसातील हवामानाबाबत मुंबई वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार, कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि राज्यातील काही भागांत ६ जानेवारी आणि ७ जानेवारीला पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.