वारणेची बिले शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा

    वारणानगर : येथील श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्यात २०-२१या गळीत हंगामात गाळपास आलेल्या १५ जानेवारीपासूनची शेतकऱ्यांची थकीत सर्व ऊस बिले कारखान्याने गुरुवारी सायंकाळी बँकेत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेले आंदोलन मागे घेण्यात आले.

    वारणा साखर कारखान्याच्या सन २०-२१ या गळीत हंगामातील पंधरा जानेवारीपासूनची ऊस बीले थकीत होते गाळप सुरू झाले पासून वारणा कारखाना व्यवस्थापनाने शेतकऱ्यांची ऊस बीले त्वरीत जमा केली होती. मात्र, त्यांनंतरची ऊस बिले देण्यास विलंब झाला होता. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष वैभव कांबळे यांनी १६ जुलैपासून ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला होता. कारखान्याचे कार्यकारी संचालक शहाजी भगत यांनी १५ जानेवारीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर थकीत ऊसबीले जमा करणार असे शिष्ठमंडळास सांगितले होते.

    त्यानुसार वारणा कारखान्याने गुरुवारीच सांयकाळी बँकेत शेतकऱ्यांच्या खात्यावर बिले जमा केल्याचे शहाजी भगत यांनी आज शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाशी बोलताना सांगितले. यानंतर जिल्हा अध्यक्ष वैभव कांबळे यांनी वारणा साखर कारखाना व्यवस्थापनाचे आभार मानले.

    यावेळी कारखान्याचे सचिव बी.बी.दोशिंगे तसेच स्वाभिमानी संघटनेचे संपत पवार, अजित पाटील, शिवाजी आंबेकर,आण्णा मगदूम, सुधीर मगदूम, दिपक सनदे,रावसाहेब मगदुम, अक्षय कांबळे आदी कार्यकर्त उपस्थित होते.