पाटगांव अंजिवडे घाटमार्गाचा नियोजनपूर्वक सर्व्हे करून मार्गाची निर्मिती करू : प्रकाश आबिटकर

  गारगोटी : तळकोकणात अत्यंत कमी अंतराने उतरणाऱ्या व सहज सोप्या अशा पाटगांव अंजिवडे या मार्गाचा तत्काळ नियोजनपुर्वक सर्व्हे करून या मार्गाच्या निर्मीतीच्या कामाला लागू, असे आश्वासन आमदार प्रकाश आबिटकर यांनी दिले. गारगोटी कार्यालयात बोलावण्यात आलेल्या सर्वपक्षीय प्रमुखांच्या बैठकीत ते बोलत होते.

  अंजिवडे पाटगांव या नव्या रस्त्याच्या निर्मितीसाठी ही विशेष बैठक आमदार प्रकाश आबिटकर यांनी रविवारी (दि.५) सकाळी अकराच्या दरम्यान आपल्या गारगोटी येथील कार्यालयात बोलावली होती. या बैठकीत पुढे बोलताना आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले की, सुरुवातीच्या काळातच शिवडाव सोनवडे घाटरस्त्याचा नियोनबध्द सर्व्हे झाला नसल्याने आता ग्रेड वाढवण्याचा विषय समोर आला आहे. त्यामुळे तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. या अडचणी सोडवण्यासाठी काही वेळ जाईलही. या घाट रस्त्याच्या बाबतीत जो सर्वे तंतोतंत होणे गरजेचे होते, तो झाला नसल्याने हा विलंब होत आहे. या अंजिवडे पाटगांव मार्गाच्या बाबतीत या चुकांची पननरावृत्ती व्हायला नको यासाठी सर्वानी मिळून दक्षता घेवूया व आवाक्यात असलेला मार्ग सर्वांच्या सहकार्याने लवकर होणार असेल तर तो तत्काळ करून घेवू. शासन पातळीवरचे सर्व सहकार्य घेऊन आहे तो रस्ता योग्य सर्व्हेच्या मार्गाने मोकळा करून घेऊ, असे प्रतिपादन आमदार आबिटकर यांनी यावेळी केले.

  या मार्गाचा अभ्यास असलेले सार्वजिनक बा चे निवृत्त उपअभियंता आर. के. देसाई व इतर जाणकारांना घेऊन केलेला सर्व्हे शासनदरबारी चुकणार नाही व त्यात पुंन्हा पुन्हा वेळ जाणार नाही याची दक्षता घेऊन नियोजनबध्दतेने वाटचाल करण्याचा निर्धार आमदार आबिटकर व इतर प्रमुखांनी केला. यासाठी आतापासूनच कामाला लागून आहे ते टप्यातील काम वेळीच पूर्ण करूया असा सूर या बैठकीत प्रमुखांनी लावून धरला.

  गोकूळ दुध संघाचे माजी संचालक दौलतराव जाधव, धनाजीराव देसाई, यांनी हा घाटरस्ता होण्यासाठी ज्या ज्या मार्गाचा अवंलंब करता येणे शक्य आहे त्या त्या मार्गाचा अवंलंब करा. शासनदप्तरी साखळी पाणंद म्हणून नोंद असल्याने हा मार्ग लगेच होण्यासाठी कोणतीही अडचण नसल्याचे आर. के. देसाई यांनी संगितले. कमी क्षेत्र वन विभागाचे जात असल्याने मंजुरीचीही फारशी अडचण होणार नसल्याचे आर. के. देसाई यांनी सांगितले. या अडचणीच्या छोट्याशा मार्गाचा प्रथम डिजिटल सर्व्हे करून घ्या, असा सल्ला बाबा नांदेकर यांनी दिला.

  शामराव देसाई ,एस एम पाटील, सुरेशराव नाईक, संदिप वरंडेकर आदिनीही काही मार्गदर्शक सुचना केल्या. सर्वांनी झटून कामाला लागल्यास हे आटोक्यातील काम लगेच होऊ शकते, असा विश्वास बैठकीत व्यक्त केला.

  या बैठकीस काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शामराव देसाई, माजी सभापती पांडुरंग पाटील, शेणगांवचे सरपंच सुरेशराव नाईक, एस एम पाटील, आप्पा वरंडेकर, संग्रामसिंह सावंत यांच्यासह अनेक प्रमुख कार्यकर्ते उपस्थीत