2020 is the year of disappointing performance of the opposition in the eyes of the people

 शिरोळमध्ये निवारा केंद्रात राहत असलेल्या गावकऱ्यांची भेट घेत उद्धव ठाकरेंनी त्यांच्याशी संवाद साधला. तर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे देखील पूरग्रस्त भागातील तीन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. कोल्हापुरातल्या चिखली गावात देवेंद्र फडणवीस यांनी आज पाहणी केली व तेथील ग्रामस्थांशी संवाद साधला.

    राज्यातील काही भागांत मुसळधार पावसामुळे अनेक रस्ते आणि ठिकाणं जलमय झाले आहेत. तसेच गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या कोसळधार पावसामुळे कोकणासह पश्चिम महाराष्ट्राला महापूराचा तडाखा बसला आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मागील काही दिवसांपासून पूरग्रस्त भागांची पाहणी करत आहेत. आज ते कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. त्यांनी  पुराचा फटका बसलेल्या शिरोळ येथील नृसिंहवाडी गावाला भेट दिली.

    शिरोळमध्ये निवारा केंद्रात राहत असलेल्या गावकऱ्यांची भेट घेत उद्धव ठाकरेंनी त्यांच्याशी संवाद साधला. तर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे देखील पूरग्रस्त भागातील तीन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. कोल्हापुरातल्या चिखली गावात देवेंद्र फडणवीस यांनी आज पाहणी केली व तेथील ग्रामस्थांशी संवाद साधला.

    दरम्यान, हे दोन्ही दिग्गज आमने-सामने आल्याची घटना घडली.  यावेळी प्रचंड गर्दी झाल्याचेही दिसून आले.  कोल्हापुरातील शाहुवाडी चौकात हे आजीमाजी मुख्यमंत्री समोरासमोर आले होते. यावेळी, तातडीची मदत दिलीच पाहिजे. पण एक कायमस्वरुपी मार्ग काढला पाहिजे अशी उद्धव ठाकरेंसोबत चर्चा झाली असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.