देवेंद्र फडणवीस यांना नट, नट्या का सुचतात; हसन मुश्रीफांचा टोला

    कोल्हापूर : ग्राम विकासमंत्री हसन मुश्रीफ यांना कोल्हापूर सोडलं तर कोण ओळखतं? ते माधुरी दीक्षित किंवा ट्रम्प आहेत का? असा टोला विरोधी पक्ष देवेंद्र फडणवीस यांनी लगावला होता. त्यावर हसन मुश्रीफ यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी संवाद साधला. ते पुढे म्हणाले, माधुरी दीक्षित यांच्यासोबत माझी तुलना कशी करता येईल? एक महिलेशी माझी तुलना होवू शकत नाही. ट्रम्प यांच्यासोबत नाव जोडल्याबद्दल आभारी मी त्यांचा आभारी आहे, ट्रम्प यांच्याबरोबर आणखी लोकप्रिय नेत्यांचे नाव जोडले असते तर चालले असते,असेही मुश्रीफ म्हणाले.

    तसेचं माझ्यावर टीका करताना देवेंद्र फडणवीस यांना नट-नट्या कशा सुचतात. त्यांनी राजकारण करण्यापेक्षा कोरोना काळात राज्य सरकारला सहकार्य करावे, कोरोना संपल्यानंतर सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न त्यांनी जरूर करावा. असा टोला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी लगावला. दरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कामाचं कौतुक केले पाहिजे, नागपुरात कोरोनाचा कहर वाढत असताना कोणतेही प्रसिद्धी न मिळवता नागपुर मदत करत आहेत. असेही मुश्रीफ म्हणाले.

    दरम्यान कोरोना संकटात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस विनाकारण राजकारण करत आहेत. त्यांनी राज्य सरकारला सहकार्य करावे. कोरोना संपल्यानंतर महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा प्लॅन त्यांनी करावा, असा खोचक टोला मंत्री मुश्रीफ यांनी लगावला.