ब्रह्माणी मातृका रूपात अंबाबाईची पूजा

विविध देवतांच्या शक्ती रूपी तत्व देवता आहेत. याचे वर्णन सप्तशती ग्रंथामध्ये आहे. असुरांच्या वधावेळी विविध देवतांनी आपापली शक्ती वापरून या देवतांना निर्माण केले. ज्या देवाचे जे रूप आहे भूषण, वाहन, शस्त्रे, अलंकार आहेत, तशाच रूपामध्ये फक्त स्त्री रूपात, देवता असुरांशी युदध करण्यासाठी आल्या.

    कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या शारदीय नवरात्र उत्सवात गुरुवारी पहिल्या दिवशी ब्रह्माणी मातृका रूपात पूजा (Worship of Ambabai) बांधण्यात आली. या पूजेचे महत्त्व असे आहे, ब्रह्माणी मातृका – ब्राह्मी माहेश्वरी चैव कौमारी वैष्णवी तथा वाराही च इंद्राणी चामुडा: सप्तमातराः  मातृका देवता या जल मातृका, स्थल मातृका इत्यादी प्रकारच्या आहेत. या मातृकांची विवाहादी मंगल कार्यामध्ये समूहामध्ये पूजन केले जाते. यांना सप्तमातृका म्हणतात.

    या विविध देवतांच्या शक्ती रूपी तत्व देवता आहेत. याचे वर्णन सप्तशती ग्रंथामध्ये आहे. असुरांच्या वधावेळी विविध देवतांनी आपापली शक्ती वापरून या देवतांना निर्माण केले. ज्या देवाचे जे रूप आहे भूषण, वाहन, शस्त्रे, अलंकार आहेत, तशाच रूपामध्ये फक्त स्त्री रूपात, देवता असुरांशी युदध करण्यासाठी आल्या. आज प्रथम मातृका ब्रह्माणी | ब्राह्मी या रूपात श्री महालक्ष्मी – अंबाबाईची पुजा बांधण्यात आली आहे.

    ब्रम्हाणी ही ब्रम्हदेवाची शक्ती आहे. ही चार मुख असणारी व चर्तुभूज आहे, तिने पिवळे वस्त्र परिधान केले असून हातामध्ये अपमाळ, कमंडलू, पुस्तक, घंटा आहे. तिचे वाहन हंस आहे. ब्राह्मी स्वर्ण समाध्येया मृगचर्म विभूषीता, अक्षमालाभये दण्डकुण्डिक दधतो करे : ही पूजा श्रीपूजक चेतन चौधरी व लाभेश मुनिश्वर यांनी बांधली.