अंबाबाईची कौमारी वैष्णवी रूपात पूजा 

करवीर निवासिनी अंबाबाईच्या नवरात्र उत्सवाच्या तिसऱ्या दिवशी कौमारी वैष्णवी रूपात पूजा बांधण्यात आली. ही पूजा श्रीपूजक मयूर मुनेश्वर, सोहम मुनेश्वर, सुकृत मुनेश्वर यांनी बांधली.

    कोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाईच्या नवरात्र उत्सवाच्या तिसऱ्या दिवशी कौमारी वैष्णवी रूपात पूजा बांधण्यात आली. ही पूजा श्रीपूजक मयूर मुनेश्वर, सोहम मुनेश्वर, सुकृत मुनेश्वर यांनी बांधली.
    या पूजेचे माहात्म्य असे आहे, ब्राहमी माहेश्वरी, चैव कुमारी, वैष्णवी  तथा वारहाच इंद्राणी चामुंडा सप्तमातरा ही देवांची सेनापती अथवा विविध देवता कार्तिक याची शक्ती आहे. हिला कौमारी, कार्तिका किंवा अंबिका म्हणूनही ओळखण्यात येते. कौमारी मोरावर स्क्तवर असून तिला बारा हात असतात. तिच्या हातात भाला, कुराड, शक्ती, किंवा टांक आणि धनुष्य आहे. ही देवता असे संबोधण्यात येते. नवरात्रीच्या तिसर्‍या दिवशी अशा पद्धतीनेही पूजा बांधण्यात येते.
    नवरात्रीच्या चौथ्या दिवशी ललित पंचमी सून या दिवशी टेंबलाई मंदिर येथे कोहळा फोडण्याचा कार्यक्रम होणार आहे. मोजक्याच लोकांच्या प्रमुख उपस्थित हा सोहळा पार पडणार आहे.