You too will be disgusted to see the filthy glory of this Panipuriwala

पाणीपुरी विक्रेत्याचे अनेक प्रकार यापूर्वी देखील उघडकीस आले आहेत. मात्र, कोल्हापूरमधील(kolhapur) पाणीपुरी विक्रेत्याचे घाणेरडे कृत्य पाहून तुम्हाला अजिबात पाणीपुरी खाण्याची इच्छा होणार नाही.

कोल्हापुर:  पाणीपुरी विक्रेत्याचे अनेक प्रकार यापूर्वी देखील उघडकीस आले आहेत. मात्र, कोल्हापूरमधील(kolhapur) पाणीपुरी विक्रेत्याचे घाणेरडे कृत्य पाहून तुम्हाला अजिबात पाणीपुरी खाण्याची इच्छा होणार नाही.

कोल्हापूरच्या रंकाळा तलाव (rankala lake) परिसरातील एक पाणीपुरी विक्रेता सार्वजनिक शौचालयाच्या(public toilet) टाकीतलं पाणी वापरत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. काही स्थानिक तरुणांनी या प्रकाराचा व्हिडिओ तयार केला. या व्हिडिओत पाणीपुरी विक्रेता आपल्या साथीदाराच्या मदतीने टाकीतले पाणी एका कॅनमध्ये भरताना दिसत आहे. नंतर हाच पाण्याचा कॅन तो आपल्या ठेल्यावर रिकामा करत आहे.  या प्रकारानंतर या तरुणांनी पाणीपुरी विक्रेत्याच्या सर्व सामानाची नासधूस करत त्याला चांगलाच धडा शिकवला.

शौचालयाच्या टाकीतलं पाणीच हा विक्रेता पाणीपुरीसाठी वापरत होता. ग्राहकांना पिण्यासाठीही हेच पाणी देण्यात येत होतं.