आई-वडिलांना ठार मारण्याची धमकी देऊन तरुणीकडून पैसे उकळणाऱ्या तरुणांना अटक

आई-वडिलांना ठार मारण्याची धमकी देऊन युवतीच्या आईचे 40 ते 44 तोळे सोन्याच्या दागिन्यांवर गंडा घालून जबरदस्तीने लग्नाच्या कागदावर सही करून घेतली.

    जयसिंगपूर : आई-वडिलांना ठार मारण्याची धमकी देऊन युवतीच्या आईचे 40 ते 44 तोळे सोन्याच्या दागिन्यांवर गंडा घालून जबरदस्तीने लग्नाच्या कागदावर सही करून घेतली. नऊ जणांवर जयसिंगपूर पोलिसात गुन्हा दाखल (Jaysingpur Crime) झाला होता. याप्रश्नी पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करून संशयिताकडून तीन मोटरसायकल, 23 सोने असा एकूण 13 लाख 72 हजारांचा मुद्देमाल जयसिंगपूर पोलिसांनी हस्तगत केल्याची माहिती राजेंद्र मस्के यांनी दिली.

    पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांचे मार्गदर्शनाखाली पोसई प्रमोद वाघ, अजित पाटील, पोलिस कॉन्स्टेबल असलम मुजावर, रोहित डावाळे, संदेश शेटे, जावेद पठाण यांनी सखोल तपास करून रेहान अस्लम हुसेन नदाफ (वय 24), साहील नजीर नदाफ (वय 23, दोघे रा.उदगाव), अनिकेत धनाजी शिंदे (वय 25 वर्षे, रा.जयसिंगपूर), शाहरूख अयुब जमादार (वय 29, रा. दानोळी) यांना शिताफिने पाठलाग करुन अटक केली होती.

    तपासामध्ये यातील 23 तोळे सोन्याचे दागिने, तसेच संशयितांनी वापरलेल्या तीन मोटरसायकल असा एकूण 13 लाख 72 हजार रुपये किमंतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.