Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ladki Bahin Yojana |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एमपीएसस्सी MPSC मध्ये निगेटिव्ह मार्किंगबद्दल मोठा निर्णय; राज्यसेवेची तयारी करणाऱ्यांना दिलासा

  • By Vivek Bhor
Updated On: Sep 09, 2020 | 09:10 AM
MPSC मध्ये निगेटिव्ह मार्किंग

MPSC मध्ये निगेटिव्ह मार्किंग

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या (MPSC)  सर्व प्रकारच्या बहुपर्यायी परीक्षांकरीता (एमसीक्यू) आता नकारात्मक गुणांसाठी (निगेटिव्ह मार्किंग) एकच सूत्र लागू होणार आहे. एका चुकीच्या उत्तरासाठी पंचवीस टक्के किंवा १/४ गुण मिळालेल्या एकूण गुणांमधून वजा केले जाणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा (students get relief) मिळाला आहे.

एमपीएससी (MPSC) तर्फे घेतल्या जाणाऱ्या वस्तुनिष्ठ पद्धतीच्या परीक्षांना निगेटिव्ह मार्किंग नव्हते, त्यामुळे विद्यार्थी योग्य उत्तर माहिती नसले तरी एका पर्यायाला गोल करून टाकायचे. यात सुधारणा करत ‘एमपीएससी’ने २००९ पासून निगेटिव्ह मार्किंग सुरू केले. त्यामध्ये चार चुकीच्या उत्तराला एक गुण वजा करण्यात येत होता. राज्य सेवा परीक्षेला तीन चुकीच्या गुणांना एक गुण कमी होत असे. या दरम्यानच्या काळात थोडेफार बदल (changes) करण्यात आले होते. आता नवीन पद्धतीने गुण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापुढे जाहीर होणार या परीक्षेच्या परीक्षेच्या तारखांना ही पद्धत अवलंबिली जाणार आहे.

हे आहेत बदल (These are the changes)

प्रत्येक चुकीच्या उत्तराकरीता २५% किंवा १/४ एवढे गुण एकूण गुणांमधून वजा/कमी करण्यात येतील. एखाद्या प्रश्नाचे एकापेक्षा अधिक उत्तरे दिली असल्यास अशा प्रश्नाचे उत्तर चुकीचे समजण्यात येऊन त्या प्रश्नाच्या उत्तराकरीता २५% किंवा १/४ एवढे गुण एकूण गुणांमधून वजा/कमी करण्यात येतील.

या कार्यपध्दतीचा अवलंब करताना एकूण अंतिम गुणांची बेरीज अपूर्णांकात आली तरीही ती अपूर्णांकातच राहील व पुढील कार्यवाही त्याच्या आधारे करण्यात येईल. एखाद्या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरित असेल तर, अशा प्रकरणी नकारात्मक गुणांची पध्दत लागू असणार नाही. असा बदल एमपीएससी’ने केला आहे.

आयोगामार्फत यापुढे जाहीर होणाऱ्या स्पर्धा परीक्षा, मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षांच्या निकालाकरीता हा नियम लागू राहील. आयोगाच्या संकेतस्थळावरील संबंधित परीक्षांच्या परीक्षा योजनांमध्ये यथावकाश सुधारणा करण्यात येतील. तोपर्यंत उपरोक्त कार्यपध्दतीनुसार कार्यवाही करण्यात येईल, असे आयोगाने परिपत्रकात नमूद केले आहे.

[read_also content=”महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) परीक्षा पुढे ढकलली, सुधारित तारखा जाहीर https://www.navarashtra.com/career/maharashtra-government-postpone-mpsc-exam-due-to-corona-virus-27780.html”]

“आयोगाने नकारात्मक गुण पद्धतीत केलेला बदल उमेदवारांसाठी सुखद असून विशेषतः राज्यसेवा परीक्षेत प्रश्न सोडविण्याचे प्रमाण वाढून पर्यायाने गुणांमध्येही वाढ होऊ शकते.”

– डॉ. सुशील बारी, मार्गदर्शक, स्पर्धा परीक्षा

“राज्य सेवेसाठी पूर्वी तीन चुकीच्या उत्तरासाठी एक गुण कमी होत होता. आता चार चुकीच्या उत्तरासाठी एक गुण कमी होईल. निगेटिव्ह मार्किंगचा धोका धोका कमी झाल्याने प्रश्न सोडविण्याचे प्रमाण वाढेल. या निर्णयाने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.”

– स्वप्निल जाधव, स्पर्धा परीक्षा विद्यार्थी

[read_also content=”महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) परीक्षा पुढे ढकलली, राज्य सरकारचा मोठा निर्णय https://www.navarashtra.com/career/maharashtra-government-postpone-mpsc-exam-due-to-covid-19-24615.html”]

Web Title: The same formula of negative marking for all mpsc exams

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2020 | 08:56 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.