
लग्नघरातील आनंदाचा वातावारण एका क्षणात बदलले आहे. लग्नातील मेजवानीनंतर २०० वऱ्हाड्यांना रुग्णलायात दाखल करण्यात आले आहे. लातुरात दोनशे वऱ्हाडींना जेवणातून विषबाधा झाली आहे.
लातुर : लग्नघरातील आनंदाचा वातावारण एका क्षणात बदलले आहे. लग्नातील मेजवानीनंतर २०० वऱ्हाड्यांना रुग्णलायात दाखल करण्यात आले आहे. लातुरात दोनशे वऱ्हाडींना जेवणातून विषबाधा झाली आहे.
लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यात वाढवणामध्ये विषबाधेची ही घटना घडली. येथील इसाक हवालदार यांच्या मुलीचे लग्न होते. लग्न सोहळ्यात जेवण केल्यानंतर अनेक जणांना त्रास सुरु झाला. मळमळ, चक्कर यासारखी लक्षणं जाणवल्याने जेवणानंतर अनेकांना त्रास सुरु झाला. यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे.
वऱ्हाडींना लातूरमधील वाढवणा, जळकोट आणि उदगीर भागातील रुग्णालयांमध्ये इउपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
सुदैवाने कोणाचीही प्रकृती गंभीर नसल्याची माहिती डॉक्टरांनी दिल्यामुळे काहीसा दिलासा मिळाला. मात्र एकाच वेळी दोनशे जणांची प्रकृती बिघडल्यामुळे लग्नघरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले.