
लातुरमधील एका शाळेच्या हॉस्टेलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला. एकाच वेळेस ४० विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याने खबळ उडाली असून आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.
लातूर : लातुरमधील एका शाळेच्या हॉस्टेलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला. एकाच वेळेस ४० विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याने खबळ उडाली असून आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.
लातूर शहरातल्या एमआयडीसी भागात हे हॉस्टेल आहे. या हॉस्टेलमधील ४० विद्यार्थ्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे.
हे विद्यार्थी शिक्षणासाठी लातूरच्या या शाळेच्या वसतिगृहात रहायला आहेत.
३२९ विद्यार्थी येथे राहतात. यापैकी ४० विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. येथील १० शिक्षक, २० इतर कर्मचारी आणि उर्वरीत विद्यार्थ्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.