पैश्याचा वादातून झालेल्या हाणामारीत एकाच मृत्यू ; संतप्त नातेवाईकांची वाहनांवर दगड फेक

शफी अहमदच्या मृत्यनंतर काही संतप्त तरुणांनी शहरात काही वाहनांवर दगडफेक केली. यात अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे. तर स्थानिक लोकं जखमी झाली. दरम्यान, मयताच्या नातेवाईकांनी मयताचे प्रेत पोलिस ठाण्याच्या दारात ठेवत आरोपींना अटक करण्याची मागणी केली.

लातूर: जिल्ह्यातल्या उदगीर शहरात पैश्यांच्या देवाण घेवाणीवरून सुरू झालेल्या वादाचे रूपांतर दोन गटातील हाणामारीपर्यंत पोहचले. या हाणामारीत जखमी झालेल्या एका तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. घटनेमुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी तरुणाचा मृतदेह हा पोलीस ठाण्यासमोरच ठेवला आहे. तसंच उदगीर शहरात तुफान दगडफेक केली. उदगीर शहरात पैश्यांच्या देवाण घेवाणीवरुन काही दिवसांपूर्वी दोन गटात तुफान हाणामारी झाली होती. या हाणामारीत शफी अहमद हा ३२ वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान या युवकाचा आज मृत्यू झाला.

त्यामुळे मृत शफी अहमदच्या कुटुंबीय आणि मित्रांनी तीव्र संताप व्यक्त केला. त्याच्या मृत्यनंतर काही संतप्त तरुणांनी शहरात काही वाहनांवर दगडफेक केली. यात अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे. तर स्थानिक लोकं जखमी झाली. दरम्यान, मयताच्या नातेवाईकांनी मयताचे प्रेत पोलिस ठाण्याच्या दारात ठेवत आरोपींना अटक करण्याची मागणी केली.या घटनेमुळे शहरात एकच गोंधळ उडाला होता. ‘अफवांवर विश्वास न ठेवता पोलिसांना सहकार्य करावे’ असं आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक हिंम्मत जाधव यांनी केले.

तसंच, आरोपींना लवकरात लवकर अटक केली जाईल असं मयताच्या नातेवाईकांना आश्वासन दिल्यानंतर तणाव काहीसा निवळला. खबरदारी म्हणून उदगीर शहरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.