लातूरमध्ये आणखी २५ कोरोनाबाधितांची भर

  • जिल्ह्यात कोरोनाची साथ तेजीने पसरत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. लातूर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ६४७ इतकी झाली आहे. तर २१७ कोरोना बाधितांवर रुग्णालयात उपचार सुरु आहे. एकूण बरे झालेल्यांची संख्या ३२२ वर पोहोचली आहे. त्यात कोरोनामुळे शुक्रवारी आणखी ३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

लातूर – लातूरमधील विलासराव देशमुख वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत शुक्रवारी २७५ अहवाल तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यातील २५ कोरोना संशयित रुग्णांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातली २५ ही रुग्ण कोरोनाबाधित निघाले आहेत. तसेच प्रलंबित असलेले १३ रुग्णांचा अहवालगही पॉझिटिव्ह आला आहे. शुक्रवारी आलेल्या अहवालांपैकी २१७ जणांचे अहवाल प्राप्त झाले ते सर्व निगेटिव्ह आले. त्यातील १७ जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. आणि ११ जणांचे रद्द झाले होते. 

जिल्ह्यात कोरोनाची साथ तेजीने पसरत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. लातूर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ६४७ इतकी झाली आहे. तर २१७ कोरोना बाधितांवर रुग्णालयात उपचार सुरु आहे. एकूण बरे झालेल्यांची संख्या ३२२ वर पोहोचली आहे. त्यात कोरोनामुळे शुक्रवारी आणखी ३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.