लातूरमध्ये महिलेला मारहाण करुन सामूहिक अत्याचाराचा प्रयत्न; भाजपची महिला आघाडी आक्रमक

राज्यात महिला सुरक्षित नाहीत. महिलांचं संरक्षण करता येत नसेल, तर शिवबंधन बांधणाऱ्या सरकारने खुर्ची रिकामी करावी, अशी मागणी भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा उमा खापरे यांनी केली आहे. लातूर जिल्ह्यातल्या कोपरा आणि बीड जिल्ह्यातल्या बर्दापूर येथील दोघी पीडित महिलांची भेट घेतल्यानंतर त्या लातूरमध्ये बोलत होत्या.

    लातूर : राज्यात महिला सुरक्षित नाहीत. महिलांचं संरक्षण करता येत नसेल, तर शिवबंधन बांधणाऱ्या सरकारने खुर्ची रिकामी करावी, अशी मागणी भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा उमा खापरे यांनी केली आहे. लातूर जिल्ह्यातल्या कोपरा आणि बीड जिल्ह्यातल्या बर्दापूर येथील दोघी पीडित महिलांची भेट घेतल्यानंतर त्या लातूरमध्ये बोलत होत्या.

    लातूर जिल्ह्यातील कोपरामध्ये महिलेला मारहाण करुन तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप उमा खापरे यांनी यावेळी केला. पोलिसांवर सरकारचे नियंत्रण नाही. त्यामुळेच राज्यात महिला अत्याचाराच्या घटना घडत आहेत, असे त्या म्हणाल्या.

    खापरे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर दबावाच्या राजकारणाचा आरोप केला होता. आधीपासून तिच्यावर तक्रार मागे घेण्यासंबंधी दबाव होता. त्यामुळे तिने तक्रार मागे घेतल्याचं आम्हाला आश्चर्य वाटत नाही. आमचा मुद्दा हा आहे की मुंडे यांनी प्रतिज्ञापत्रात दुसऱ्या बायकोचा उल्लेख तसेच तिच्यापासून झालेल्या दोन मुलांचा उल्लेख केला नाही, ते कायद्याच्या परिघाबाहेर आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी उमा खापरे यांनी केली होती.