शेतकऱ्यांना मोठा दिलासा, पिक विमाधारकांना २५ टक्के आगाऊ नुकसान भरपाईचा अध्यादेश जारी

जिल्ह्यात मध्यंतरीच्या पावसाच्या खंडामूळे झालेल्या नुकसानीबाबत प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत सोयाबीन पिकाचे विमाधारक शेतकऱ्यास २५%आगाऊ नुकसान भरपाईचा अध्यादेश जारी करण्यात आले आहे. लातूर जिल्ह्यात सोयाबीन पिकाचे खरीप-२०२१ मध्ये पेरणी झालेले क्षेत्र ४५७८२३ हे. असून संपूर्ण जिल्ह्यातील सर्वच म्हणजे ६० महसूल मंडळातून ५०६९८१ शेतकऱ्यांनी पिक विमा योजनेत सहभाग नोंदविलेला आहे.

    लातूर : जिल्ह्यात मध्यंतरीच्या पावसाच्या खंडामूळे झालेल्या नुकसानीबाबत प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत सोयाबीन पिकाचे विमाधारक शेतकऱ्यास २५%आगाऊ नुकसान भरपाईचा अध्यादेश जारी करण्यात आले आहे. लातूर जिल्ह्यात सोयाबीन पिकाचे खरीप-२०२१ मध्ये पेरणी झालेले क्षेत्र ४५७८२३ हे. असून संपूर्ण जिल्ह्यातील सर्वच म्हणजे ६० महसूल मंडळातून ५०६९८१ शेतकऱ्यांनी पिक विमा योजनेत सहभाग नोंदविलेला आहे.

    जिल्ह्यात सुरवातीच्या काळात समाधानकारक पाऊस झालेला होता तथापी, जुलै, ऑगस्ट-२०२१ मध्ये पावसाने मोठा खंड दिल्याने त्याचा प्रतिकुल परिणाम सोयाबीन पिकावर झालेला होता. कृषी विभागाचे अधिकारी ,विदयापीठ शास्त्रज्ञ आणि विमा कंपनीचे प्रतिनिधी समवेत सोयाबीन पिक नुकसानीचा अंदाज घेण्यात आला.

    दरम्यान त्यानूसार लातुर जिल्हयातील सर्वच तालुक्यातील सर्व म्हणजे साठही महसुल मंडळामध्ये हंगामातील प्रतिकुल परिस्थिती निर्माण झाली असून जोखीम लागू झालेली आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हास्तरीय संयुक्त समिती, प्रधान मंत्री पिक विमा योजना यांनी अधिसुचनेव्दारे सोयाबीन पिकाचे संभाव्य नुकसान भरपाई रक्कमेच्या २५%आगाऊ रक्कम विमाधारक शेतकऱ्यांना देण्यासाठी भारतीय कृषी विमा कंपनी लि.मुंबई यांना आदेशित केल्याचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी कळविलेले आहे.