Fraud

लातूरमधील(latur businessman fraud) व्यापारी वैजनाथ लक्ष्मण डोंगरे हे डोंगरे ट्रेडिंग कंपनीच्या माध्यमातून वेगवेगळ्या शेतकऱ्यांना बाजारपेठेपेक्षा वाढीव भावाने सोयाबीन, तूर, उडीद, मूगाची थेट गावातून खरेदी करीत होता. ठरल्याप्रमाणे शेतकऱ्यांना पैसेही देत होता. मात्र त्याने तब्बल ४३ शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.

    लातूर: बाजारपेठेपेक्षा जास्त भाव देतो म्हणून येथील एका व्यापाऱ्याने ४३ शेतकऱ्यांकडून सोयाबीन खरेदी करून दोन कोटी १७ लाख ९० हजार ७५५ रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

    लातूरमधील व्यापारी वैजनाथ लक्ष्मण डोंगरे हे डोंगरे ट्रेडिंग कंपनीच्या माध्यमातून वेगवेगळ्या शेतकऱ्यांना बाजारपेठेपेक्षा वाढीव भावाने सोयाबीन, तूर, उडीद, मूगाची थेट गावातून खरेदी करीत होता. ठरल्याप्रमाणे शेतकऱ्यांना पैसेही देत होता. यातून त्याने अनेक शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला.

    धनादेश वटलाच नाही

    तानाजी देवकर यांनी २०१८-१९ मध्ये त्यांच्या शेतातील पाच लाख ४० हजार रुपयांचे १३३ क्विंटल सोयाबीन डोंगरे याला दिले. त्यावर डोंगरे याने देवकर यांना त्यांच्या व त्यांच्या मुलांच्या नावे धनादेश दिले होते. मात्र ते बँकेत वटले नाहीत. त्यानंतर देवकर यांनी डोंगरे यांच्याकडे विकलेल्या सोयाबीनच्या पैशाची मागणी केली. मात्र त्याने काहीच प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर देवकर यांनी अधिक माहिती घेतली. त्यांच्यासारख्या ४३ शेतकऱ्यांनाही डोंगरे याने पैसे दिले नसल्याचे समोर आले.