लातूरमधील निलंग्यात कोरोनाचा बळी

  • तालुक्यात कोरोनाचे एकूण ४० रुग्ण उपचार घेत आहेत तर ५ जणांना कोरोनामुळे मृत्यू आला आहे. तसेच ७० कोरोना संशयित संस्थात्मक विलगीकरणात आहेत. शिवाय प्रशासकीय पातळीवरही कोरोना संसर्गाचा फैलाव होणार नाही यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

निलंगा – तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत आहे. कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. शहरासह तालुक्यात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रसार होईल असे वाटले नव्हते. यामुळे तेथील व्यापारी संघटनेने ५ दिवसीय बंद पुकारला होता. परंतु यापुढे दुकाने बंद राहणार की चालू याबाबतीत आधीक माहिती मिळाली नाही. हे अद्याप अस्पष्ट आहे. तालुक्यात कोरोनामुळे  २ मृत्यू झाला आहे. त्यानंतर ३ लोकांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत. 

तालुक्यात कोरोनाचे एकूण ४० रुग्ण उपचार घेत आहेत तर ५ जणांना कोरोनामुळे मृत्यू आला आहे. तसेच ७० कोरोना संशयित संस्थात्मक विलगीकरणात आहेत. शिवाय प्रशासकीय पातळीवरही कोरोना संसर्गाचा फैलाव होणार नाही यासाठी प्रयत्न केले जात आहेत.