बालविवाह प्रकरणी ८ जणांवर गुन्हे दाखल,लातूरमधील भयानक प्रकार

एका पंधरा वर्षाच्या मुलीचा विवाह (child marriage)औसा तालुक्यातील सारोळा गावातील मुलाशी १७ मे २०२० रोजी लावण्यात आला होता. या अल्पवयीन मुलीला त्रास असल्याने तिने केंद्रीय महिला व बालविकास खात्याच्या चाईल्ड हेल्पलाईनवर तक्रार केली होती.

    लातूर: औसा तालुक्यातील सारोळा येथे झालेल्या एका बालविवाह (child marriage)संदर्भात औसा पोलिसांनी आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या संदर्भात अल्पवयीन विवाहित मुलीने चाईल्ड हेल्पलाईनवर फोन करून याबाबत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी सारोळा गावाचे ग्रामसेवकाकडून माहिती घेतली असता, एका पंधरा वर्षाच्या मुलीचा विवाह झाल्याचे उघड झाल्याने सदर ग्रामसेवकाच्या तक्रारीवरून मुलीचे आई वडील, सासू सासरे, नवरा, अन्य दोन लग्न जमविणारे व लग्न लावलेल्या ब्राम्हणावर गुन्हा दाखल(crime in latur) करण्यात आला आहे.

    एका पंधरा वर्षाच्या मुलीचा विवाह औसा तालुक्यातील सारोळा गावातील मुलाशी १७ मे २०२० रोजी लावण्यात आला होता. या अल्पवयीन मुलीला त्रास असल्याने तिने केंद्रीय महिला व बालविकास खात्याच्या चाईल्ड हेल्पलाईनवर तक्रार केली होती.