नवरा म्हणाला, ‘वांग्याची भाजी दे’, बायको म्हणाली, ‘संपलीय’, चिडलेल्या नवऱ्याने रॉकेल टाकून दिली पेटवून

मद्यधुंद अवस्थेत घरी आलेल्या पतीने आपल्या पत्नीकडे जेवायला वांग्याची भाजी देण्याचा आग्रह केला. पत्नीने भाजी संपली आहे असं सांगताच पतीने रागाच्या भरात पत्नीच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिले. ज्यामध्ये पत्नी फर्जाना शेख ही गंभीररीत्या जखमी झाली आहे.

    लातूर : वांग्याच्या भाजीसाठी पतीने पत्नीला रॉकेल टाकून पेटवल्याची धक्कादायक घटना लातूर जिल्ह्यातल्या हेर इथं घडली आहे. लातूरच्या उदगीर तालुक्यातील हजार-दीड हजार लोकसंख्येचं हेर हे गावं. या लहानश्या गावातील घटनेने संपूर्ण लातूर जिल्हा हादरला आहे.

    मद्यधुंद अवस्थेत घरी आलेल्या पतीने आपल्या पत्नीकडे जेवायला वांग्याची भाजी देण्याचा आग्रह केला. पत्नीने भाजी संपली आहे असं सांगताच पतीने रागाच्या भरात पत्नीच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिले. ज्यामध्ये पत्नी फर्जाना शेख ही गंभीररित्या जखमी झाली आहे.

    सकाळी फर्जाना हिने वांग्याची भाजी केली होती, मात्र शादूल वाद करून जेवण न करताच निघून गेला होता. रात्री येऊन त्याने वांग्याचीच भाजी देण्याचा आग्रह धरला. भाजी संपलीय असे सांगताच त्याने फर्जानावर रॉकेल ओतून पेटवून दिले. त्यात ती गंभीररित्या जखमी झाली आहे.

    अतिशय गंभीर भाजलेल्या फर्जाना शेख यांच्यावर लातूरच्या सरकारी दवाखान्यात उपचार सुरु आहेत. पोलिसांनी आरोपी पती शादूल शेख याला अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

    husband threw kerosene and set his wife on fire in latur udgir maharashtra