chandrakant patil

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील(chandrakant patil) यांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उडवली आहे. असंवेदनशिल आणि घाबरट सरकार असल्याचे म्हणत विरोधकांना बोलू दिले जात नसल्याचा आरोप केला आहे.

लातूर :  भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील(chandrakant patil) यांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उडवली आहे. असंवेदनशिल आणि घाबरट सरकार असल्याचे म्हणत विरोधकांना बोलू दिले जात नसल्याचा आरोप केला आहे.

चंद्रकांत पाटील सध्या मराठवाडा दौ-यावर आहेत. यावेळी लातूर येथे पत्रकारांशी ते बोलत होते. कोरोनाचे कारण देत अधिवेशन टाळणा-या सरकारने या मुद्द्यावर मागील अधिवेशनात बोलू दिले नाही. असंवेदनशील आणि घाबरट सरकारला विरोधकांचे मत ऐकून घेण्याची इच्छाच नसल्याचा आरोप त्यांनी केला.

हिवाळी अधिवेशन नागपूर करारानुसार नागपूरात होत नसेल तर किमान अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपूरात व्हावे. तसेच मुंबईत होणारे अधिवेशन १५ दिवस चालवावे अशी मागणी त्यांनी केली.

या अधिवेशनात मराठा आरक्षण,  कोरोना,  शेतक-यांचे प्रश्न या मुद्यांवर पळ न काढता दोन दोन दिवसांच्या चर्चा करून उत्तर द्यावे अशी आमची मागणी असल्याचे ते म्हणाले. ४७दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी राज्य सरकारने प्रयत्न केला नाही. त्यामुळे मराठा समाजातील तरुण चिंतेत आहे.