किरीट सोमय्या 26, 27 तारखेला लातूर आणि नांदेड दौऱ्यावर; मंत्री अमित देशमुख आणि अशोक चव्हाण यांचा घोटाळा उघड करणार का? याकडे सर्वांचं लक्ष

किरीट सोमय्या यांनी 26 आणि 27 तारखेला लातूर आणि नांदेडला जाणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे नांदेडमधील मोठा नेता अशोक चव्हाण आहेत. तर त्यांच्याबद्दल काही खलासा करणार का अशी चर्चा सुरु आहे. तर लातूर मध्ये जाऊन सोमय्या कोणत्या मंत्र्याचा घोटाळा उघड करणार का,? अशीही चर्चा सुरु आहे.

    लातूर : भाजप नेते तथा माजी खासदार किरीट योमय्या यांनी दिवाळीनंतर आणखी एका मोठ्या नेत्याचा घोटाळा बाहेर आणणार असं वक्तव्य नुकतंच केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता पुढचा नंबर कोणाचा असा प्रश्न विचारला जातोय.

    दरम्यान याचं पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या यांनी 26 आणि 27 तारखेला लातूर आणि नांदेडला जाणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे नांदेडमधील मोठा नेता अशोक चव्हाण आहेत. तर त्यांच्याबद्दल काही खलासा करणार का अशी चर्चा सुरु आहे. तर लातूर मध्ये जाऊन सोमय्या कोणत्या मंत्र्याचा घोटाळा उघड करणार का,? अशीही चर्चा सुरु आहे.

    दरम्यान लातूरातील मोठा मंत्री अमित देशमुख आहेत. त्यांच्याबद्दल सोमय्या कोणता खुलासा करणार का, अशी चर्चा सुरु आहे. आपण गेल्या अनेक महिन्यापासून पहतोय की, सोमय्यांनी अनेक मंत्र्यांचे घोटाळे उघड केले आहेत. त्यामुळे नांदेड आणि लातूर मध्ये सोमय्या कोणता गौप्यस्फोट करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

    चंद्रकांत पाटील काय म्हणाले होते?

    भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी येत्या 26 आणि 27 ऑक्टोबर रोजी सोमय्या नांदेडला येणार आहेत, असं सांगितलं आहे. आधी किरीट सोमय्या यांचं सूचक वक्तव्य आणि नंतर चंद्रकांत पाटील यांनी दिलेली माहिती या सर्व गोष्टींमुळे भाजपच्या रडारवर असलेला नांदेडमधील तो बडा नेता कोण ? असा प्रश्न सर्वांनाच पडलाय.

    26 किंवा 27 तारखेला किरीट सोमय्या नांदेड आणि लातूरला येणार

    ईडीची पुढची कारवाई नांदेडला होणार असल्याचे संकेत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले होते. माझ्या हसण्यावरुन समजून जा, असं ते म्हणाले होते. त्यानंतर आज पुन्हा ईडीच्या कारवायाबाबत तुम्हाला कसं कळत असं मंत्री अशोक चव्हाण यांनी विचारलं. येत्या 26 किंवा 27 तारखेला किरीट सोमया नांदेडला येणार आहेत. करा बातमी मोठी, असं पाटील म्हणाले.

    त्यांच्या या वक्तव्यानंतर आता ईडीच्या रडारवर नेमकं कोण असं विचारलं जात आहे. तसेच दिवाळी झाली की एका बड्या नेत्याचा आणखी एक घोटाळा बाहेर काढणार असं किरीट सोमय्या यांनीही आजच सांगितलं आहे. चंद्रकांत पाटील तसेच किरीट सोमय्या या दोघांच्याही वक्तव्यानंतर आता ईडीच्या रडारवर असलेला नांदेडमधील बडा नेता कोण असावा याचे अंदाज बांधले जात आहेत.

    आरोप करताच तपास संस्थांची चौकशी नेत्यांच्या मागे

    किरीट सोमय्या यांनी यापूर्वी महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांवर गंभीर स्वरुपाचे आरोप केलेले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापूसन ते मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री अनिल परब अशी ही मोठी यादी आहे. विशेष म्हणजे सोमय्या यांनी आरोप केल्यानंतर लगेच ईडी, आयकर विभाग अशा तपास संस्थांची चौकशी या नेत्यांच्या मागे लागलेली आहे. त्यामुळे सोमय्या आणि चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यानंतर आता कोणाचा नंबर ? कोण तपास संस्थांच्या रडारवर ? असं विचारलं जाऊ लागलंय.