वैद्यकीय शिक्षण विभाग १५ ते २० हजार पदं भरणार : अमित देशमुख

विशेष म्हणजे कोरोना काळात सलग सेवा देणाऱ्या डॉक्टरांना सामावून घेण्यासाठी देखील सरकार सकारात्मक असल्याचंही देशमुख यांनी सांगितले आहे.

    लातूर : राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागात लवकरच 15 ते 20 हजार पदांची भरती करण्यात येणार आहे. विविध वर्गवारीतील ही पदांची भरती असणार आहे. यासाठी मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली असून लवकरच ही भरती प्रक्रिया पार पडेल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे. विशेष म्हणजे कोरोना काळात सलग सेवा देणाऱ्या डॉक्टरांना सामावून घेण्यासाठी देखील सरकार सकारात्मक असल्याचंही देशमुख यांनी सांगितले आहे.

    याआधी आरोग्यमंत्र्यांकडून घोषणा

    कोरोना काळात आरोग्य यंत्रणेवर मोठी जबाबदारी होती. मात्र, काही ठिकाणी कर्मचाऱ्यांची कमी जाणवत होती. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण येत होता. आरोग्य यंत्रणेवरील ताण लक्षात घेता राज्याच्या आरोग्य विभागात 17 हजार पदांची भरती होणार आहे. यापैकी 8 हजार 500 पदांची भरती निघणार आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी 17 जानेवारी 2021 रोजी दिली होती