अनुकूल वातावरण निर्माण होताच वैद्यकीय परीक्षा घेण्यात याव्या – अमित देशमुख

  • राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी कोरोना काळात अनुकूल वातावरण निर्माण होताच वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याचे आदेश दिले आहेत. तसेच प्रथम द्वितीय आणि तृतीय वर्षातील वैद्यकीय विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम सुरु करण्यात यावा असा आदेश कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसकर यांना दिला आहे.

लातूर – देशात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. कोरोनाचा संसर्ग जलदगतीने पसरत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी देशातील सर्वच राज्यात लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे सर्वच उद्योग, व्यवसाय, नोकरी, शिक्षण बंद आहेत. परंतु राज्यात विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबतचा प्रश्न ऐरणीवर आहे. राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार असल्याचे जाहीर केले होते. वैद्यकीय विद्यर्थ्यांच्या परीक्षांचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले होते. परंतु कोरोना विषाणू अजूनही आटोक्यात आला नसल्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे अनुकूल वातावरण तयार झाले का वैद्यकीय परीक्षा घेण्याचे आदेश शिक्षण मंत्र्यांनी दिले आहेत.

राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी कोरोना काळात अनुकूल वातावरण निर्माण होताच वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याचे आदेश दिले आहेत. तसेच प्रथम द्वितीय आणि तृतीय वर्षातील वैद्यकीय विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम सुरु करण्यात यावा असा आदेश कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसकर यांना दिला आहे. तसेच उर्वरीत नॉन सर्टिफाईंग परीक्षा पुढे ढकलण्याच्या सुचना केल्या आहेत. अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणात बाधा निर्माण होऊ नये यासाठी त्यांच्या इंटर्नशिप सरु करण्यात याव्या अशी सुचना देखील केली आहे.