लातूर जिल्ह्यात नाईट कर्फ्यू; जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांचे आदेश

मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये सध्या कोरोनाने आपले हातपाय चांगलेच पसरले आहेत. त्यामुळे इथे कडक निर्बंध लागू करण्याचे आदेश देण्यात येत आहेत. दरम्यान, आता लातूर जिल्ह्यात जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी लातूर शहर महानगरपालिका आणि उदगीर, औसा, निलंगा तसेच अहमदपूर नगरपालिका हद्दीत रात्रीची संचारबंदी लागू करण्याचे आदेश दिले आहेत.

    लातूर (Latur).  मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये सध्या कोरोनाने आपले हातपाय चांगलेच पसरले आहेत. त्यामुळे इथे कडक निर्बंध लागू करण्याचे आदेश देण्यात येत आहेत. दरम्यान, आता लातूर जिल्ह्यात जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी लातूर शहर महानगरपालिका आणि उदगीर, औसा, निलंगा तसेच अहमदपूर नगरपालिका हद्दीत रात्रीची संचारबंदी लागू करण्याचे आदेश दिले आहेत.

    लातूर जिल्ह्यात बुधवारपासून ते पुढील आदेश येईपर्यंत रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत रात्रीची संचारबंदी लागू करत असल्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. या आदेशात अत्यावश्यक सेवांना वैद्यकीय सेवा, मेडिकल्स, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था यांना सूट देण्यात आलेली आहे. या आदेशाचे कोणीही उल्लंघन करताना आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.