लातूर जिल्ह्यात कोरोनाचा कहर, रुग्णांची संख्या ६६८ वर

 लातूर जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. लातूरमध्ये आतापर्यंत ६६८ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच ३३ जणांचा मृत्यूही झाला आहे. लातूर जिल्ह्यतील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

काल शनिवारी ११ जुलै रोजी लातूर जिल्ह्यात कोरोनाचे ३४ रूग्ण आढळून आले होते. तसेच येथील एका रूग्णाचा मृत्यू देखील झाला होता. आजपर्यंत जिल्ह्यातील ६६८६  जणांच्या स्वॅबची तपासणी करण्यात आलेली आहे, त्यामध्ये ६६८ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. 

मिळालेल्या माहितीनुसार, लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत काल शनिवारी ११ जुलै रोजी ३६६ जणांचे स्वॅब तपासणीसाठी आलेले होते. सध्या उपचारानंतर बरे होऊन घरी परतलेल्या रुग्णांची संख्या ३६४ एवढी आहे.