लातूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रकोप वाढला, २४ तासात ५३ कोरोनाबाधितांची नोंद

  • लातूर शहरात कोरोनाचा प्रकोप वाढतच आहे. जिल्ह्यात तब्बल एका दिवसात ५३ नवे कोरोनाबाधित सापडले आहेत. यामुळे लातूर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ६१२ वर गेली आहे. यामधील २७२ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत आणि ३२२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच कोरोनामुळे २८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी राज्यात ३१ जुलै पर्यंत लॉकडाऊन केला आहे.

लातूर – जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. देशासह राज्याक कोरोनाचे संकट अधिक गडद होताना दिसत आहे. मुंबई पुण्यात कोरोनाचे जास्त रुग्ण सापडले आहे. तसेच राज्यात इतर जिल्ह्यातही कोरोनाचा प्रकोप वाढत आहे.(latur corona update) त्यामुळे देशात लॉकडाऊन केला आहे. लॉकडाऊनमुळे परिस्थिती नियंत्रणात असली तरी प्रकरणे वाढताना दिसत आहे. लातूर शहरातही कोरोनाच प्रसार मोठ्या प्रमाणात झाला आहे. 

लातूर शहरात कोरोनाचा प्रकोप वाढतच आहे. जिल्ह्यात तब्बल एका दिवसात ५३ नवे कोरोनाबाधित सापडले आहेत. यामुळे लातूर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ६१२ वर गेली आहे. यामधील २७२ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत आणि ३२२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच कोरोनामुळे २८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी राज्यात ३१ जुलै पर्यंत लॉकडाऊन केला आहे.