चिक्की घोटाळ्यावरून धनंजय मुंडेंनी केलेल्या आरोपाला पंकजा मुंडेंनी दिले प्रत्युत्तर, म्हणाल्या…

देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात चिक्की प्रकरण(Chikki Scam) गाजलं होतं. आमच्या बहिणीने तर लहान मुलांच्या चिक्कीचे पैसे खाल्ले, असे धनंजय मुंडे(Dhanajay Munde) यांनी म्हटले.

  माजी मंत्री पंकजा मुंडे(Pankaja Munde) यांच्या काळात चिक्की घोटाळा(Chikki Scam) झाल्याची चर्चा झाली होती. या प्रकरणावरून आता धनंजय मुंडे(Dhananjay Munde) यांनी पंकजा मुंडेवर निशाणा साधला. मात्र पंकजा मुंडे यांना याबाबत विचारले असता हा प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी म्हटले आहे. लातूरमध्ये ओबीसी मेळाव्यासाठी पंकजा मुंडे उपस्थित होत्या.त्यावेळी त्यांनी धनंजय मुंडे यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे. तसेच महाविकास आघाडी सरकारवर टीकासुद्धा केली आहे.बीड जिल्ह्यात गुंडगिरी वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

  धनंजय मुंडे काय म्हणाले ?
  मुंबई हायकोर्टाने अजूनही खासगी पुरवठादारांवर एफआयआर दाखल का केला नाही? असा प्रश्न धनंजय मुंडे यांनी राज्य सरकारला विचारला. देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात चिक्की प्रकरण गाजलं होतं. आमच्या बहिणीने तर लहान मुलांच्या चिक्कीचे पैसे खाल्ले, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले.

  पंकजा मुंडेंचे प्रत्युत्तर
  चिक्की घोटाळ्याचा आरोप हा प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न आहे. चिक्की प्रकरणात कुणाचीही कसलीही तक्रार करण्यात आलेली नाही. कुणालाही काही त्रास झालेला नाही.कुणाला विषबाधा झालेली नाही, असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं आहे.

  पंकजा मुंडे यांनी पुढे सांगितलं की, बीड जिल्ह्यात जनता, व्यापारी, व्यावसायिक यांच्यावर खूप दबाव आहे. वाळूमाफियांची संख्या वाढली आहे. अवैध दारु, मटक्याचे अड्डे वाढले आहेत. आम्ही रोज पोलिसांना बोलतोय. हे सर्व बीड जिल्ह्यासाठी हानिकारक आहे.