राज्यात या ठिकाणी पेट्रोलने ओलांडला १०० चा आकडा, मात्र जवळच मिळतंय स्वस्तात पेट्रोल

लातूर जिल्ह्यातील धर्माबादमध्ये पहिल्यांदाच पेट्रोलनं शंभरी पार केली. धर्माबादमध्ये एक लिटर पेट्रोलसाठी सध्या १०० रुपये २९ पैसे मोजावे लागत आहेत. तर डिझेलची किंमत आहे ८९ रुपये ६३ पैसे. धर्माबादपासून काही किलोमीटर अंतरावरच तेलंगणा राज्याची सीमा सुरू होते. तेलंगणात मात्र महाराष्ट्राच्या तुलनेत पेट्रोल ५ रुपयांनी स्वस्त आहे. 

    देशात सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती नवनवे उच्चांक करत आहेत. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच पेट्रोलने तिहेरी आकडा गाठला असून महाराष्ट्रातही साधे पेट्रोल शंभरच्या वर पोहोचल्याचं चित्र आहे.

    लातूर जिल्ह्यातील धर्माबादमध्ये पहिल्यांदाच पेट्रोलनं शंभरी पार केली. धर्माबादमध्ये एक लिटर पेट्रोलसाठी सध्या १०० रुपये २९ पैसे मोजावे लागत आहेत. तर डिझेलची किंमत आहे ८९ रुपये ६३ पैसे. धर्माबादपासून काही किलोमीटर अंतरावरच तेलंगणा राज्याची सीमा सुरू होते. तेलंगणात मात्र महाराष्ट्राच्या तुलनेत पेट्रोल ५ रुपयांनी स्वस्त आहे.

    पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्यांचे बजेट अगदी कोलमडूून गेले आहे. लातूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी पेट्रोलचे दर शंभरीच्या उंबरठ्यावर आहेत. मात्र लातूर जिल्ह्याचं शेवटचं टोक असणाऱ्या धर्माबादमध्ये मात्र दरानं शंभरी ओलांडलीय. या ठिकाणाहून जवळच असणाऱ्या तेलंगणामध्ये पेट्रोल तुलनेने स्वस्त असल्यामुळे अनेक नागरिक सध्या तेलंगणातून पेट्रोल भरणं पसंत करत असल्याचं चित्र आहे.

    धर्माबादचं पेट्रोल महाग का?

    महाराष्ट्रात मुंबई, मनमाड, अकोला, धुळे, चंद्रपूर, खापरी आणि सोलापूर या ठिकाणांहून पेट्रोल वितरित केलं जातं. धर्माबादला मिळणारं पेट्रोल हे सोलापूरहून वितरित होतं. सोलापूर ते धर्माबाद हे सर्वात जास्त अंतर आहे. त्यामुळे वाहतुकीचा खर्च जास्त येतो. परिणामी धर्माबादमध्ये सर्वात महाग पेट्रोल मिळतं. तर शेजारील तेलंगणामध्ये येणारं पेट्रोल हे हैद्राबादवरून वितरित होतं.