School starts from 9th to 12th from 4th January in Pune, big decision of Municipal Commissioner

मागील आठवड्यापासून आरोग्य विभागाकडून तपासणी सुरू आहे. रविवारी तपासणीचे काम पूर्ण झाले. मात्र, तपासणीत जिल्ह्यातील १० हजार ६३० पैकी ११४ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. पॉझिटिव्ह (Positive) शिक्षकांमुळे जिल्ह्यातील ५७ शाळा बंद आहेत.

लातूर : राज्य सरकारने  (State Government) २३ नोव्हेंबरपासून माध्यमिक शाळांतील इयत्ता नववी व दहावी तर उच्च माध्यमिकचे अकरावी व बारावीचे वर्ग (Class) सुरू करण्याचे आदेश दिले होते. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली. यात शाळांची निर्जंतुकीकरण करण्यासोबत शाळांतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी (Corona Testing)  करण्याचे नियोजन करण्यात आले.

मागील आठवड्यापासून आरोग्य विभागाकडून तपासणी सुरू आहे. रविवारी तपासणीचे काम पूर्ण झाले. मात्र,
तपासणीत जिल्ह्यातील १० हजार ६३० पैकी ११४ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. पॉझिटिव्ह (Positive) शिक्षकांमुळे जिल्ह्यातील ५७ शाळा बंद आहेत. दरम्यान, ९२ टक्के शाळांचे कामकाज सुरू झाले तरी या शाळांत २० टक्के विद्यार्थ्यांनीच हजेरी लावली आहे.

पॉझिटिव्ह शिक्षकामुळे ५७ शाळा बंद

जिल्ह्यातील एकूण ६३२ माध्यमिक शाळांपैकी ६०२ तर २७६ उच्च माध्यमिक शाळांपैकी २५० शाळा सुरू झाल्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी औदुंबर उकिरडे यांनी सांगितले. माध्यमिक शाळांतील नववी व दहावीच्या ९२ हजार ८३७ पैकी २२ हजार ४४५ विद्यार्थी अकरावी व बारावीच्या ७० हजार १२३ पैकी सहा हजार ५८२ विद्यार्थ्यांनी शाळेत हजेरी लावली आहे. सुरू झालेल्या ९२ टक्के शाळांत १९.५ टक्के विद्यार्थी उपस्थित आहेत.