राज्यातील पहिलीचं घटना; कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लातूर जिल्ह्यातील हे गाव झालं सील

    लातूर : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे आता प्रशासनाचीही चिंता वाढली आहे. दरम्यांन कोरोना रुग्णासंख्या वाढत असताना लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील लिंबाळवाडी गावात १६१ रुग्णासंख्या वाढ झाली आहे. याचं पार्श्वभूमीवर प्रशासनाने गाव १० दिवसासाठी सील केलं आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील गाव सील होण्याची राज्यातील ही पहिलीच घटना घडली आहे.

    लिंबाळवाडी गावात कसा वाढला कोरोना ?

    लिंबाळवाडी गावात शिवनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात गावातील काही भाविक सहभागी झाले होते दरम्यान गावातील एका व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे चाचणी नंतर स्पष्ट झाले. दुसऱ्या दिवशी त्याच्या संपर्कातील ९ व्यक्ती पॉझिटिव्ह आल्या दोन दिवसांत गावातील २७५ लोकांची चाचणी करण्यात आली. त्यात ९८ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. गावात कोरोना संसर्ग वाढत असल्याने आरोग्य पथक गावात दाखल झाले. डॉ श्रीनिवास हरणाले यांच्या पथकाने काल 225 जणांची तपासणी केली असता त्यात ६३ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्या आता ही रुग्णासंख्या १६१ वर पोहचली आहे.

    दरम्यान गावातील 60 वर्षापेक्षा जास्त वयाच्या रुग्णावर 22 व्यक्तीला चाकूर येथील कोरोना केअर सेंटर इथं दाखल केलं आहे तर उर्वरित बाधितांना होम आयसोलेशन केले आहे. तहसीलदार शिवानंद बिडवे यांनी गावास भेट देऊन 10 दिवस गाव सील केले आहे. गावातून आत बाहेर जाणे येण्यास बंदी घातली आहे.