राज्य सरकारची अवस्था आंधळं दळतं आणि कुत्रं पीठ खातं अशी झाली; देवेंद्र फडणवीसांची टीका

राज्य सरकारची अवस्था आंधळं दळतं आणि कुत्रं पीठ खातं अशी झाली आहे. आमच्या काळात जे लोक विमा कंपन्यांचे कार्यालय फोडत होते तेच आज सत्तेत येऊन बसलेत. आमची मागणी ही आहे की, शेतकऱ्यांना सरसकट मदत द्या. सरकार आणि यंत्रणा झोपलेली आहे.’ त्यांना जागं करण्यासाठी म्हणून आम्ही दौरा करत असल्याची टीका फडणवीसांनी सरकारवर केली आहे.

    लातूर : गेल्या काही दिवसांपासून अनेक भागांत मुसळधार पाऊस पहायला मिळत आहे. अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांच खूप नुकसान झालंय. याचीच पाहणी करण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मराठवाडा दौऱ्यावर आहेत. त्यांच्यासोबत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकरही दौऱ्यावर आहे.

    दरम्यान अशातच आता या दौऱ्यावर असताना फडणवीसांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीसांनी लातूर आणि नांदेड भागात झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी लातूरमध्ये बोलताना फडणवीसांनी महाविकास आघाडी आणि ठाकरे सरकावर टीका केली आहे.

    देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले? 

    शेतकऱ्यांसोबत संवाद साधताना सरकारी यंत्रणा आणि पीक विमा कंपनी यांच्यात काही ताळमेळ नसल्याचं त्यांनी म्हटलं. विम्याचं काम हे केंद्र सरकारकडे असल्याचं, राज्य सरकार म्हणत आहे. मात्र विम्याचे नियमही राज्य सरकार स्वतः ठरवत आहे, असं म्हणत फडणवीसांनी ठाकरे सरकावर टीकास्त्र सोडलं आहे.राज्य सरकारची अवस्था आंधळं दळतं आणि कुत्रं पीठ खातं अशी झाली आहे. आमच्या काळात जे लोक विमा कंपन्यांचे कार्यालय फोडत होते तेच आज सत्तेत येऊन बसलेत. आमची मागणी ही आहे की, शेतकऱ्यांना सरसकट मदत द्या. सरकार आणि यंत्रणा झोपलेली आहे.’ त्यांना जागं करण्यासाठी म्हणून आम्ही दौरा करत असल्याची टीका फडणवीसांनी सरकारवर केली आहे.

    दरम्यान, या दौऱ्यात शेतकऱ्याचं टाहो ऐकायला मिळाला. प्रचंड नुकसान झाल्यामुळं शेतकऱ्यांनी फडणवीसांसमोर आपला आक्रोश व्यक्त केला. त्यामुळे आता फडणवीसांनी दसऱ्याच्या आधी शेतकऱ्यांना मदत द्या, अशी मागणी राज्य सरकारकडे केली आहे.