Extreme steps taken by employees due to non-receipt of salary for 3 months; Suicide of two ST employees in Jalgaon and Ratnagiri
प्रतिकात्मक फोटो

ही घटना घडली लातूर जिल्ह्याच्या निलंगा तालुक्यातील शहाजानी बस स्थानकात. दारुच्या नशेत असणाऱ्या तरुणांना त्यांच्या गावी जायचे होते. मात्र रात्र झाल्यामुळे कुठलेच वाहन त्यांना मिळत नव्हते. त्यामुळे ते थेट एसटी आगारात गेले आणि तिथली एसटी त्यांनी पळवून नेली. शहाजानी बस स्थानकातून एसटी घेऊन हे तरूण शेळगी या गावी गेले. 

    कायद्याची दहशत नसेल, तर काय होऊ शकतं, याची प्रचिती नुकत्याच घडलेल्या एका घटनेतून आलीय. लातूर जिल्ह्यात घडलेल्या या घटनेमुळं सर्वसामान्यांमध्ये संतापाची लाट उसळलीय.

    ही घटना घडली लातूर जिल्ह्याच्या निलंगा तालुक्यातील शहाजानी बस स्थानकात. दारुच्या नशेत असणाऱ्या तरुणांना त्यांच्या गावी जायचे होते. मात्र रात्र झाल्यामुळे कुठलेच वाहन त्यांना मिळत नव्हते. त्यामुळे ते थेट एसटी आगारात गेले आणि तिथली एसटी त्यांनी पळवून नेली. शहाजानी बस स्थानकातून एसटी घेऊन हे तरूण शेळगी या गावी गेले.

    एसटी घेऊन जाताना काही ठिकाणी ही बस धडकली. एका खांबाला या बसने टक्कर दिली. त्यामुळे तिथल्या वायरी उन्मळून पडल्या आणि वीजपुरवठा खंडित झाला. वीजेचा खांबदेखील उन्मळून पडला. बसस्थानकात झोपलेल्या कंडक्टर आणि ड्रायव्हर यांना पहाटे उठल्यावर एसटी गायब असल्याचं लक्षात आलं. त्यांनी तातडीनं पोलिसांत धाव घेतली आणि या प्रकाराची तक्रार दिली. पोलिसांनी शोध घेतल्यानंतर ही बस शेळगी या गावात आढळून आली.

    या घटनेत एसटीचंही नुकसान झालं असून सुमारे २५ हजार रुपयांची हानी झाल्याचं समजतंय. मात्र एसटी खात्याकडून याची कुठलीही तक्रार करण्यात आली नसल्यामुळे पुढे कुठलीच कारवाई होताना दिसत नाही. शहाजानी एसटी स्थानकात सीसीटीव्हीी कॅमेरा नसल्यामुळे या घटनेचं रेकॉर्डिंग उपलब्ध नसल्याचं कळतंय. त्यामुळं हे तरुण नेमके कोण होते, ते समजू शकत नसल्याचं सांगितलं जातंय.