२०२५ पर्यंत जगात राहणार १ अब्ज लठ्ठ माणसे; कारण वाचून थक्क व्हाल

२०११ मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएच्ओ)लठ्ठपणाचे प्राणघातक परिणाम निदर्शनास आल्यानंतर जगभरातील राष्ट्रांना या विरोधात पावले उचलण्याचे आवाहन केले होते.

लंडन. येत्या दहा वर्षांत म्हणजे २०२५ पर्यंत जगभरातील लठ्ठ माणसांची संख्या वाढून १०० कोटींवर पोहोचण्याचा इशार संशोधकांनी दिला आहे. पाश्चिमात्य पद्धतीच्या आहारामुळे जग लठ्ठपणाच्या आहारी जात आहे, असा दावा संशोधकांनी केला आहे. पाश्चिमात्य खाद्यपदार्थ दिसायला आकर्षक असतात. त्यामुळे साहजिकच खवय्यांच्या तोंडाला पाणी सुटून ते त्याच्यावर आडवा हात मारतात, असे संशोधकांनी म्हटले आहे.

२०११ मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएच्ओ)लठ्ठपणाचे प्राणघातक परिणाम निदर्शनास आल्यानंतर जगभरातील राष्ट्रांना या विरोधात पावले उचलण्याचे आवाहन केले होते. तसेच २०१५ पर्यंत ढेरपोट्या व्यक्तींची संख्या 2010 मधील आकडेवारीच्या तुलनेत कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते.