28 years old man jailed for breaching covid 19 law to meet visit his girlfriend in Scotland
कोरोना : साडेचार तासांच्या प्रवासानंतर गर्लफ्रेंडला भेटण्याऐवजी त्याची रवानगी थेट तुरूंगात

प्रेमात आणि युद्धात सगळं काही माफ असतं असं नेहमीच म्हटलं जातं पण ही गोष्ट अनेकदा खोटी सिद्ध झालीये. तुमचा विश्वास बसत नाहीये मग स्कॉटलंड्च्या या महाशयांची ही कहाणी वाचाच.२८ वर्षांचा डेल मॅक्लॉफलिन आपल्या गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी शुक्रवारी ४० किलोमीटरचा प्रवास करून इथल ऑफ व्हिटोर्नहून रॅमसेला पोहोचला. या प्रवासासाठी त्याला साडेचार तास लागले. पण घडलं भलंतच प्रेमिकेला भेटण्यासाठी गेलेल्या या महाशयांची कोरोना महामारीच्या नियमांमुळे थेट तुरुंगात रवानगी झाली आहे.

कायद्याचे उल्लंघन करत केला होता आर्यलंडमध्ये प्रवेश

मिळालेल्या माहितीनुसार, डेलने या आधी कधीच वॉटर स्कूटर चालविली नव्हती. पण फक्त प्रेयसीला भेटण्यासाठी जेट स्कीच्या मदतीने आयरिश समुद्र पार केला. तो नियमांचे उल्लंघन करत आर्यलंडमध्ये दाखल झाला असल्याची त्याने कबुलीही दिली. यानंतर त्याला चार आठवडे तुरुंगवासाची शिक्षा झाली. आर्यलंडवर असलेल्या कायद्यांनुसार, फक्त विशेष सवलतीच्या आधारेच या ठिकाणचे रहिवासी नसलेले लोक ऑईल ऑफ मॅन मध्ये प्रवेश करू शकतात.

२५ किलोमीटरची पायपीटही केली

डेलने वाहन विकत घतले आणि सुमारे ४० किलोमीटरचा प्रवासही केला असल्याची माहिती त्याच्या वकिलाने दिली. त्याला अशी आशा होती की, तो हे अंतर ४० मिनिटांत कापेल पण दुपारी १ वाजता रॅमस येथे दाखल झाल्यानंतर त्याला डगलस स्थित आपल्या प्रेयसीच्या घरी पोहोचण्यासाठी २५ किलोमीचरची पायपीटही करावी लागली.

प्रेयसीसोबत गेला नाइट क्लबला

तथापि, आपल्या प्रेयसीच्या घरी पोहोचल्यानंतर दोघेही नाइटक्लबला गेले. जेव्हा डेलने आपली खोटी ओळखही सांगितली. पण सखोल चौकशी केल्यानंतर त्याने आपण कायद्याचे उल्लघंन करत येथे प्रवेश केला असल्याचे सांगितले. रविवारी पोलिसांनी डेलला अटक केली. यापूर्वी, डेलला सप्टेंबर महिन्यात या द्वीपावर छोटी-मोठी कामे करण्यासाठी ४ आठवडे राहण्याची मुदत दिली होती. तेव्हा १४ दिवस क्वारंटाईन राहिल्यानंत एक दिवस तो आपल्या प्रेयसीला भेटला होता.

नैराश्याशी लढतो आहे – वकिलाने दिले स्पष्टीकरण

जाणूनबुजून द्वीपाच्या कायद्यांचे उल्लंघन केल्याचा प्रयत्न आणि कोरोना महामारीच्या काळात येथे राहणाऱ्यांसाठी त्याने धोका निर्माण केला तर डेलच्या वकिलांच्या मते, तो नैराश्याच्या गर्तेतून जात असून आपल्या प्रेयसीला भेटण्याच्या कारणामुळेच त्याची ही अवस्था झाल्याचे त्याच्या वकिलाने सांगितले.