76% of Marathi youth decide marriage on their own Marathi Matrimony Research Report
७६% मराठी तरूण / तरूणी स्वत:हून लग्नाचा निर्णय घेतात: मराठी मॅट्रिमोनी संशोधन अहवाल

या माहितीवरून मराठी तरूण वर्गाच्या कल्पना आणि लग्न करताना आपल्या जोडीदाराबद्दल त्यांच्या असलेल्या अपेक्षांबद्दल खूपच चांगली माहिती हाती आली.

मुंबई : भारत मॅट्रिमोनीचा एक भाग असलेली, मराठी मॅट्रिमोनी, ही मराठी तरूणांचे लग्न जुळवणारी एक अग्रगण्य संस्था आहे, काही दिवसांपुर्वी त्यांनी आपल्या लाखो नोंदणीकृत युझर्सचा एक रचनात्मक अभ्यास केला. या माहितीवरून मराठी तरूण वर्गाच्या कल्पना आणि लग्न करताना आपल्या जोडीदाराबद्दल त्यांच्या असलेल्या अपेक्षांबद्दल खूपच चांगली माहिती हाती आली.

मराठी मॅट्रिमोनी संशोधन अहवलाची काही महत्वाची माहिती:

या युझर बेसमध्ये ३०% महिला तर ७० % पुरूषांचा समावेश होता.

आजचा तरूण वर्ग लग्नाचा निर्णय स्वत:हून घेण्यास पसंती देतो, कारण या अहवालात असे लक्षात आले आहे की 76% तरूण स्वत: आपला मॅट्रिमोनी प्रोफाइल तयार करतात, तर फक्त ७% पालक किंवा त्यांची भावंड त्यांच्याकरता हे प्रोफाइल तयार करतात. आश्चर्य म्हणजे ५५% महिला आणि ६१% पुरूष आपल्या जाती बाहेरील जोडीदार बघण्यास तयार होते.

काही तरूण / तरूणी आपल्याकरता परदेशात देखील जोडीदार बघत होते ज्यात प्रामुख्याने युएसए, जर्मनी, कॅनडा आणि फ़्रान्सचा समावेश होता.

२६ %महिला आणि ७ % पुरूष आपला जोडीदार उच्च पद्धवीधर असावा अशी अपेक्षा करतात.

पुरूषांमध्ये व्यवसायिक दृष्ट्या “ उद्योगात निपुण आणि स्वत:चा व्यवसाय असणारे होते” तर त्या खालोखाल कार्यकारी आणि पर्यवेक्षकांची संख्या होती. महिला नोंदणीकृतांमध्ये, सॉफ्टवेअरमध्ये कार्य करणाऱ्या आणि त्या नंतर “कार्यकारी” पदावरील महिलांचा समावेश होता.

सर्वाधिक नोंदण्यांमध्ये महाराष्ट्रातील पाच जिल्हे जे अग्रगण्य स्थानावर होते, ते म्हणजे पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर आणि अहमदनगर. राज्याच्या बाहेर राहणाऱ्या मराठी तरूणांमध्ये सर्वाधिक नोंदणी ही बेंगळुरू, बेळगाव, हैद्राबाद आणि वडोदरा येथून होती.

गेल्या २० वर्षात, मराठी मॅट्रिमोनीने लाखो मराठी भाषिकांची मने जिंकत जोडीदाराच्या निवड संस्थांमध्ये पहिला क्रमांक मिळविला आहे. आम्ही आमचा युझर बेस मराठी समाजामध्ये जागतिक स्तरावर वाढवितो आहोत आणि त्यांना सर्वोत्तम अशी सेवा देण्याचा प्रयत्न करतो आहोत.

मुरुगावेल जानकीरामन, संस्थापक आणि सीईओ, Matrimony.com (मॅट्रिमोनी.कॉम)

अधिक माहितीकरिता, भेट द्या: https://www.matrimony.com