वास्तुशास्त्रानुसार ‘ही’ गोष्ट चुकीच्या जागी असेल तर होते आर्थिक हानी!

नदीकिनाऱ्याचा फोटो किंवा फाऊंटन लावणे खूप शुभ असते. मात्र हेच फाऊंटेन जर चुकीच्या दिशेला लावले गेले तर त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

वास्तूशास्त्रानुसार घरात धबधबा, नदीकिनाऱ्याचा फोटो किंवा फाऊंटन लावणे खूप शुभ असते. मात्र हेच फाऊंटेन जर चुकीच्या दिशेला लावले गेले तर त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो. तेव्हा जाणून घ्या कुठे लावावे फाऊंटेन…

कॉरिडॉर किंवा बाल्कनीमध्ये : आपल्या घराला लोकांच्या वाईट नजरेपासून वाचविण्यासाठी आणि बिझनेसमधील तोटा दूर करण्यासाठी फाऊंटेन किंवा वाहत्या नदीचा फोटो बाल्कनी किंवा कॉरिडॉरमध्ये लावणे शुभ असते. असे केल्यास वाईट काळ संपतो आणि सर्व शुभ होते.

उत्तर-पूर्व दिशा : जर आपल्यावर संकटांचा काळ सुरू असेल तर आपल्या घरात उत्तर-पूर्व दिशेला मातीपासून बनवलेला माठ किंवा सुरईमध्ये पाणी भरून ठेवावे. जर ते शक्य नसेल तर या दिशेला घरात फाऊंटेन लावावे.

स्वयंपाक घरात लावू नये : एक बाब कायम लक्षात ठेवावी. पाण्याशी संबंधित कोणताही फोटो किंवा शो पिस स्वयंपाकघरात लावू नये. किचनमध्ये जलस्रोत आधीपासूनच असतो. स्वयंपाकघरात नळ असतो त्यामुळे तिथे दुसऱ्या कुठल्याही जलस्रोताची गरज नसते.

असा लावा वॉटरफॉल : जर आपल्या घरात बगिचा असेल तर तिथे असा फाऊंटेन अवश्य बनवून घ्यावा. लक्षात ठेवा की बगिच्यात फाऊंटेन लावत असाल तर पाण्याची दिशा ही आपल्या घराच्या बाजूने असावी, बाहेरच्या बाजूने असू नये.

फाऊंटेन लावण्याची योग्य दिशा : घरात फाऊंटेन उत्तर किंवा दक्षिण-पूर्व दिशेला लावावे. कारण त्यामुळे आपली प्रगती आणि विकासाची दिशा कायम राहते.