money plant

वास्तुशास्त्रानुसार(Vastushastra) मनी प्लांट(Right Direction For Money Plant) आग्नेय दिशेला लावलं गेलं पाहिजे. आग्नेय दिशेला झाड लावल्यास सकारात्मक ऊर्जा(Positive Energy) मिळते. आर्थिक लाभ होण्यास मदत मिळते.

  आजकाल प्रत्येकाच्या घरामध्ये आपल्याला मनी प्लांट(Money Plant At Home) बघायला मिळतो.मात्र वास्तुशास्त्रानुसार (Vastushastra) जर तुम्ही हा मनी प्लांट योग्य दिशेला लावला नसेल तर यामुळे आर्थिक नुकसान होऊ शकतं.

  वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट घरात एका विशिष्ट दिशेला लावायला हवा. असं केलं तरच मनी प्लांट लावल्याचा फायदा होतो. चुकीची दिशा तुमच्या आर्थिक नुकसान होण्यास कारणीभूत ठरते.

  योग्य दिशा
  वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट आग्नेय दिशेला लावलं गेलं पाहिजे. आग्नेय दिशेला झाड लावल्यास सकारात्मक ऊर्जा मिळते. आर्थिक लाभ होण्यास मदत मिळते.

  मनी प्लांट आग्नेय दिशेला लावण्यामागचं एक कारण आहे. आग्नेय म्हणजे दक्षिण-पूर्वच्या मधली दिशा. या दिशेचे देवता गणपती आहेत. गणपती अशुभ गोष्टीचा नाश करतात. त्यामुळे मनी प्लांट आग्नेय दिशेला लावलं पाहिजे. या दिशेचं प्रतिनिधीत्व शुक्र करतो. शुक्र हा सुख समृद्धी आणतो. यामुळे मनी प्लांट आग्नेय दिशेला लावलं पाहिजे.

  कोणत्या दिशेला मनी प्लांट लावणे घातक ?
  वास्तुशास्त्रानुसार मनीप्लांट ईशान्य दिशेला लावू नये. ईशान्य म्हणजे उत्तर-पूर्व मधली दिशा. ही दिशा मनी प्लांटसाठी नकारात्मक ऊर्जा देणारी दिशा आहे. या दिशेचे प्रतिनिधीत्व बृहस्पती करतात. शुक्र आणि बृहस्पतीमध्ये शत्रुत्वाचा संबंध आहे. ईशान्य दिशेला तुळस लावू शकता.